Posts

Showing posts with the label " करुणा त्रिपदि "

Sadguru yave mam bhajni sadar vhave

Image
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे.           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे||धृ|| तव आगमने विघ्ने पळती | कामादिक रिपु नष्टचि होती |  आशा तृष्णा मनिं बहुत झुरती | कोठे जावे ||१|| भवविपिनीचा मार्ग भयंकर | क्षीरधारेपरि म्हणती कविवर |  सदगुरु येउनि धरितिल जरि कर | अमरचि व्हावे ||२|| किती रे माझा अंत पाहसी | मज दिनासी काय मागसी | विश्वाचा तू पालक अससी | मनि समजावे||३|| माझा धावा हा परिसोनी | दंडकमंडलु करि घेवोनि | देशिक आले हो धावोनी | आसन द्यावे ||४|| हृत्पीठावरि गुरु हे बसले | भजनी प्रेमाचे पुर आले |  सीतारामी चित्त रंगले | सात्त्विक भावे ||५||       || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || || श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी की जय ||  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ...

SHRI DATTAGURU KARUNATRIPADI .

Image
🙏🏻🏵️🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🏵️🙏🏻                    🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 ॥ श्री दत्तात्रेय करुणा त्रिपदि (मराठी) ॥ — प्रथम — शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू केवळ माता जनिता । सर्वथा तू हितकर्ता ॥ तू आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥ भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ॥ तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ॥ तरि आम्ही गाउनि गाथा । तव चरणी नमवू माथा ॥ तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ॥ सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥ २ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तू नटसा होउनि कोपी । दंडिताहि आम्ही पापी ॥ पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरी न च संतापी ॥ गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच होऊ कोपी ॥ निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥ शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ॥ सांभाळु...