Posts

Showing posts with the label " Shri Guru padukashtak "

श्री दत्त गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे आठ पौराणिक शिष्य .

Image
                               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 १) श्री दत्त अवताराचे स्वरूप . त्रिमूर्तींचे एक स्वरूप म्हणजे दत्त अवतार . दत्तात्रेयांचा अवतार हा चिरंजीवी आहे  . ते कलियुगाच्या शेवटापर्यंत राहणार आहेत .  दत्तात्रेय हे इसवीसनाच्या पाचव्या शतकपासून पुराणात प्रसिद्ध आहेत . दत्तात्रेये दैवत हे तीन शिरे आणि सहा हात असे दिसायला आहे . दत्तात्रेयांच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू आहे . तर मधल्या दोन हातात त्रिशूल व डमरू आणि वरच्या दोन हातात सुदर्शन चक्र आणि शंख .  त्यांचे तीन शिर आणि सहा हातातल्या प्रत्येक वेगवेगळी गोष्ट हे त्रिमूर्तींना दर्शवितात . त्यांच्या सोबत एक गाय जी माता देवी पृथ्वी ला आणि चार कुत्रे जे चार वेद व महादेवाचे चार भैरव दर्शवितात . दत्तात्रेय जेव्हा सगुण अवतारात ( म्हणजे देह रुपात ) पृथ्वी वर होते तेव्हा त्या कालावधी मध्ये दत्त संप्रदाय मध्ये काही उप - दत्त ...

Sadguru yave mam bhajni sadar vhave

Image
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे.           🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे||धृ|| तव आगमने विघ्ने पळती | कामादिक रिपु नष्टचि होती |  आशा तृष्णा मनिं बहुत झुरती | कोठे जावे ||१|| भवविपिनीचा मार्ग भयंकर | क्षीरधारेपरि म्हणती कविवर |  सदगुरु येउनि धरितिल जरि कर | अमरचि व्हावे ||२|| किती रे माझा अंत पाहसी | मज दिनासी काय मागसी | विश्वाचा तू पालक अससी | मनि समजावे||३|| माझा धावा हा परिसोनी | दंडकमंडलु करि घेवोनि | देशिक आले हो धावोनी | आसन द्यावे ||४|| हृत्पीठावरि गुरु हे बसले | भजनी प्रेमाचे पुर आले |  सीतारामी चित्त रंगले | सात्त्विक भावे ||५||       || अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त || || श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी की जय ||  Please do copy paste !!!  कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ...

Shri Guru Padukashtak

Image
            🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरु पादुकाष्टक 🙏🏻🏵️🙏🏻                 🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 श्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला । साक्षात् परात्मा मज भेटविला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें । अंगेच मातें परब्रह्म केलें । प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची । परं पदीं संगम पूर्ण झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ३ ॥ जो सर्वदा गुप्त जनांत वागे । प्रसंन्न भक्ता निजबोध सांगे । सद्भक्तिभावांकरितां भुकेला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ४ ॥ अनंत माझे अपराध कोटी । नाणी मनीं घालुनि सर्व पोटीं । प्रबोध करितां श्रम फार झाला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ५ ॥ कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें । आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ ६ ॥ माझा अहंभाव वसे शरीरीं । तथापि तो सद्गुरु अंगिकारीं । नाहीं मनीं अल्प विकार ज्याला । विस...