Shri dattatreya janm katha .

               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻
 ( ह्या प्रतिमेचे ( छायाचित्रांचे ) सर्व श्रेय मुळ मालकाला देण्यात येते. )  
          🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻



नाव :- मराठी :- दत्तात्रेय
        संस्कृत :- दत्तात्रेय 

निवासस्थान :- श्री क्षेत्र गाणगापूर , माहूर , पांचाळेश्वर.

शस्त्र  :- त्रिशूळ , सुदर्शन चक्र.

वडील :- अत्री  ऋषी 

आई  :- अनुसया

पत्नी :- अनघालक्षमी 

अन्य नावे :- दत्त ,  अवधूत , गुरुदेव , श्रीपाद , दिगंबर .

या देवतेचे अवतार :- श्रीपाद श्रीवल्लभ , श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ.

या अवताराची मुख्य देवता :- श्री ब्रह्म , श्री विष्णू आणि महादेव .

मंत्र :- दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त.

नामोल्लेख :- श्री गुरुचरित्र , श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ .

तीर्थक्षेत्रे :- औदुंबर , नरसोबाची वाडी , पिठापुर, गाणगापूर , माहूर , गिरनार पर्वत . 


जन्म कथा :- 

[ " श्री गुरुदेव दत्त  "  या विषयावर मी केलेल्या अभ्यासानुसार खालील कथा ( माहिती ) . दत्त गुरूंच्या जन्म कथे चे मी खुप वेग वेगळे प्रसंग वाचले आणि ऐकले आहेत . त्यांच्या जन्माच्या खुप पौराणिक कथा प्रचलित आहेत . त्यातील काही प्रसंग व घटना चाळून व त्यांचा अभ्यास करून माझ्या समोर दत्त गुरूंच्या जन्माच्या दोन तर्कशुद्ध ( लॉजिकल ) घटना समोर आल्या आहेत . त्या दोन्ही घटना मी तुमच्या समोर सादर करीत आहे . ]

( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER )


{ पहिल्या घटनेची सुरुवात } 

ऋषिवर अत्रीमुनी यांच्या पत्नी देवी अनुसया ह्या अत्यंत पतिव्रता स्त्री म्हणून तिन्ही लोकात  ओळखल्या जात होत्या आणि अजूनही ओळखल्या जातात . ऋषिवर अत्रीमुनी आणि त्यांच्या पत्नी देवी अनुसया हे दोघे चित्रकूट येथे मंदाकिनी नदीच्या वरच्या बाजूला त्यांच्या आश्रमात राहत होते . पुराणातील नमूद केलेल्या काही घटनांच्या आणि श्री गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायाच्या नुसार  एकदा त्रिदेवी माता पार्वती , माता लक्ष्मी आणि माता सरस्वती  यांच्या मध्ये सर्वात सद्गुणी कोण या बद्दल वाद झाला . तेव्हा त्याचं क्षणी ऋषिराज नारद मुनी  तिथे उपस्थित झाले . त्रिदेविंनी ऋषिराज नारद मुनींना या प्रकरणाचा न्यायनिवाडा करण्यासाठी निवडले . आता नारद मुनी पूर्ण त्रयलोकात " कळीचे नारद " म्हणून  ओळखले जातात . ( तसे नारद मुनी वाईट नाही पण परमेश्वराने आखून ठेवलेल्या  कुठल्या कुठल्या घटने ला ते कारणीभूत होणार हे सगळं पूर्वरचीत असते ) . नारद मुनींना देवी अनुसये च्या पतिव्रता सत्वा बद्दल आणि तिच्या प्रखर पावित्र्य बद्दल माहीत होते. नारद मुनींनी त्रिदेविंना सती ( देवी ) अनुसया बद्दल सांगितले . नारद मुनी पुढे बोलतात " देवी अनुसये च्या पतिव्रता पावित्र्य बद्दल मी तुम्हाला काय सांगू . भूमीवर असणाऱ्या अनुसये देवीचे सद - आचरण बघून सूर्य ही भयभीत होतो. जर त्याच्या उष्णतेने तिला काही इजा झाली तर ती त्याला श्राप देईल .म्हणून तो त्याची उष्णता मंद मंद करतो . अग्नी ही तिचे पावित्र्य बघून भयभीत होऊन सौम्य होतो तर सैरा वैरा वाहणारा वारा सुद्धा भयभीत होऊन तिच्या साठी संथ गती ने वाहतो . भूमी माता सुद्धा सती अनुसया समोर नम्र होते . असे हे पंच महाभूत  पतिव्रता अनुसया समोर नम्र होऊन असतात . " 

तिच्या प्रखर पतिव्रता सत्वा बद्दल सांगितले . त्रिदेवि सती अनुसये च्या पतिव्रता पावित्र्या बद्दल ऐकून चकित झाल्या . त्रिदेवींना सती ( पतिव्रता ) अनुसये देवी बद्दल मत्सर वाटू लागला . म्हणून माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या तिघींनी देवी अनुसये च्या सत्वाची परीक्षा घेण्याचे ठरविले . त्या तिघी त्रिदेवांकडे गेल्या . त्यांना सती अनुसये बद्दल सांगितले आणि तिच्या सत्वाची परीक्षा घेण्यास सांगितले . ब्रह्म , विष्णू आणि महेश ह्यांना त्रिदेविंचा हा निर्णय अमान्य होता . त्रिदेवांना सती ( पतिव्रता ) अनुसया देवी च्या पतिव्रता पावित्र्या बद्दल आणि तिची तिच्या पती बद्दल असलेली अनन्य भक्ती व इत्तर लोकांबद्दल तिच्या मनात असलेला आदर माहीत होता . ( म्हणून देवी अनुसयेला साध्वी , सती व पतिव्रता स्त्री म्हणतात ) पण त्रिदेविंच्या आग्रह मुळे ब्रह्मा , विष्णू आणि महेश देवी अनुसये ची परीक्षा घेण्यास मृत्युलोकात ( पृथ्वी वर ) आले . त्या तिघांनी तीन साधूंचे वेश धारण केले. ते तिघे चालत ऋषी अत्रींच्या आश्रमात आले . तेव्हा पतिव्रता अनसूया देवी ने त्यांना आश्रमात येताना बघितले व त्यांच्या समोर जाऊन त्यांचे स्वागत केले . त्रिदेव आलेच होते सती ( पतिव्रता ) अनसूया देवीच्या सत्वाची परीक्षा घेण्यास . सती ( पतिव्रता ) अनसूया देवीने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसण्यास आसन दिले .तीन साधूंच्या वेशात आलेले त्रिदेवांनी सती अनसूया देवी म्हणाले की ते खुप लांबून आले आहेत आणि त्यांनी ऋषी अत्रींच्या अश्रमाबद्दल खुप ऐकले होते . ऋषी अत्रींच्या आश्रमात आलेला कुठला ही व्यक्ती रिक्त पोटी जात नाही त्याला त्याच्या इच्छनुसार जेवण जेवायला भेटते  . म्हणून ते तिघे त्यांच्या आश्रमात आले आहेत असे म्हणाले . सती अनसूया देवी ने तिघांसमोर तीन केळीची पाणे वाढली आणि  जेवण वाढायला घेतले तेवढ्यात त्या तीन साधूंनी सती अनसूया देवी ला थांबवले . त्या तीन साधूंनी सती अनसूया देवी समोर एक अट मांडली की ते भोजन तेव्हाच ग्रहण करतील जेव्हा सती अनसूया देवी विवस्त्र होऊन त्यांना अन्न वाढेल नाहीतर ते उपाशी पोटी निघून जातील . ही अशी अट ऐकून सती (पतिव्रता) अनसूया देवी घाबरल्या . त्यांच्यावर एक धर्म संकट आले होते . पतिव्रता अनसूया देवी ला समजले हे कोणी सिद्ध पुरुष आले आहेत त्यांच्या सतवाची परीक्षा घेण्यास.  म्हणून , सती अनसूया देवी देवघरात त्यांच्या पतींकडे ऋषी अत्रींकडे आल्या . ऋषी अत्री अनुष्ठान करत होते . [ काही प्रचलित कथान मध्ये ऋषी अत्री अनुष्ठानाला बाहेर न जाता आश्रमात देवघरात अनुष्ठान करत होते . या प्रचलित प्रसंगाच्या उलट  " श्री गुरु चरित्रातील ४ अध्यायाच्या कथे प्रमाणे ऋषी अत्री हे अनुष्ठान करण्यास बाहेर गेले होते ते दुपारी परत ले  .] ऋषी अत्रींनी त्यांच्या डोळे मिटून त्यांच्या ज्ञान सिद्धी ने त्या तीन साधूंचे खरे रूप पाहिले आणि सती अनसूया देवी ला गंगाजल त्या तिघांवर शिंपडायला सांगितले . सती अनसूया देवी देवघरातुन बाहेर आल्या आणि त्या साधूंनी म्हणाल्या " थांबा आता तुमच्या इच्छे प्रमाणे करते " एवढे बोलून त्या तीन साधुंवर ते गंगाजल शिंपडले आणि बघतात काय ते तीन साधू तीन तान्ह्या बालकांच्या रुपात परिवर्तित झाले . सती अनसूया देवी ने त्या तीन बालकांना जेवू घातले . [ काही प्रचलित कथानुसर सती अनसूया मातेने त्या तीन बालकांना स्तनपान हे केले होते ] . ती तीन तान्ही बालके आता ऋषी अत्री आणि पतिव्रता अनसूया माते सोबत आश्रमात राहू लागले . असे कित्येक युगे लोटली . पण ही तीन बालके आहेत त्याच स्वरूपात होती . असे होता एकदा नारद मुनिंची स्वारी ऋषी अत्रींच्या आश्रमात झाली .ऋषी अत्रींनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसण्यास आसन दिले . तेव्हढ्यात , नार्दांचे लक्ष तिथेच खेळत असणाऱ्या त्या तीन तान्ह्या बालकांवर गेले . त्यांना तात्काळ समजले ते तीन बालके कोण असतील पण ते ऋषी अत्रींच्या समोर काहीच नाही बोलले . नारद मुनी ऋषी अत्रींचा निरोप घेऊन तात्काळ स्वर्गलोकी पोहचले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला . तेव्हा देवी पार्वती , देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती फार चिंताग्रस्त झाल्या . 

त्रिदेवींनी नारद मुनींना एक विनंती केली त्या तिघींना ऋषी अत्रींच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे त्या तिघी त्यांच्या पतीस परत आणतील. नारद मुनींनी त्रिदेवींना ऋषी अत्रींच्या आश्रमात आणले . त्या तिघींनी सती अनसूया मातेस भेटून घडलेला वृत्तान्त सांगितला आणि तिची क्षमा मागितली . तेव्हा अनसूया मातेस दया आली त्यांनी हा वृत्तांत त्यांच्या पतीस ऋषी अत्रींना सांगितला . ऋषी अत्रींनी सती अनसूया मातेस ते गंगाजल दिले आणि ते त्या तीन बालकांना शिंपडण्यास सांगितले . तसे सती अनसूया माते ने ते गंगाजल त्या तीन तान्ह्या बालकांवर शिंपडले आणि त्वरित त्रिदेव स्वतःच्या मुळ स्वरूपात आले . जेव्हा ऋषी अत्रींना कळाले की ते तीन बालके हे त्रिदेव होते तेव्हा लगेच अश्रमाबाहेर आले आणि त्यांनी त्रिदेवांसमोर साष्टांग दंडवत घातला. त्रिदेव ऋषी अत्री आणि त्यांच्या पत्नी सती अनसूया माते च्या सेवे मुळे आणि सती अनसूया देविंनचे पतिव्रता पावित्र्य सिद्ध झाल्या मुळे खुप प्रसन्न होते .ब्रह्मा , विष्णू आणि महेश ह्यांनी ऋषी अत्रींना आणि सती अनसूया माते ला एक वरदान मागायला सांगितले . सती अनसूया मातेने ऋषी अत्रींना त्रिदेवांचे एकरूप गुण असलेला पुत्र मागण्यास सांगितले . तसे ऋषी अत्रींनी त्रिदेवांकडे अगदी तसाच पुत्र मागितला . ब्रह्म, विष्णू, महेश ह्यांनी तथास्तु म्हटले आणि तिथे एक लहान तान्हे बाळ प्रकट झाले . त्याच सोबत तिथे ब्रह्म देवा मधून एक ऊर्जा एका किशोरवयीन मुलाच्या रुपात प्रगट झाली ज्याचे नाव सोम ( चंद्र ) आणि महादेवांमधुन एक ऊर्जा किशोरवयीन मुलाच्या रुपात प्रगट झाली ज्याचे नाव दुर्वास होते  . त्या दोन्ही मुलांनी सती ( पतिव्रता ) अनसूया माते ची आज्ञा घेतली . सोम म्हणाला " हे माते मला आज्ञा दे मी चंद्रलोकात राहून मी तुझे आणि तू माझे दर्शन घेत राहू " . पुढे दुर्वास म्हणाला " हे माते मला आज्ञा दे मला तपश्चर्याकरण्यासाठी तीर्थ क्षेत्री जायचे आहे . " सती ( पतिव्रता ) अनसूया माते ने त्या दोघांना आशीर्वाद देऊन आज्ञा दिली . ते दोघे स्वस्थानी परतले . त्या लहान तान्ह्या बाळाचे नाव  " दत्तात्रेय " ठेवण्यात आले. दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि सती ( पतिव्रता ) अनसूया माते सोबत आश्रमात राहिले . 


[ वरील कथेत नारद मुनी हे त्रिदेवींकडे गेले होते पण " श्री गुरुचरित्राच्या  चौथ्या अध्यायाच्या "  आधारे नारद मुनी त्रिदेविंकडे उपस्थित होणार ह्या प्रसंगाच्या जागी इंद्र देव त्रिदेवांकडे सती ( पतिव्रता ) अनुसया देवी च्या पावित्र्याला भयभीत होऊन आले आहेत . खालील कथा श्री गुरु चरित्रातील कथेच्या प्रमाणे आहे . ] 

{ सती ( पतिव्रता ) अनुसये मातेच्या सद्गुनांबद्दल आणि तिच्या पतिव्रता पावित्र्य बद्दल मी पूर्व कल्पना दिली आहे . आता पुढे .... } 


( IMAGE CREDIT GOES TO REAL OWNER)
( ह्या प्रतिमेचे ( छायाचित्राचे ) सर्व श्रेय मुळ मालकाला देण्यात येते ) 


{ दुसऱ्या घटनेची सुरुवात } 

इंद्रदेव सती ( पतिव्रता ) अनुसये मातेचे पावित्र्य बघून खूप भयभीत झाले होते .  त्यांना त्यांच्या देवराज पदाची चिंता वाटू लागली . ते त्यांची व्यथा घेऊन त्रिदेवांकडे गेले . इंद्रदेवांनी  त्रिदेवांसमोर त्यांची व्यथा मांडली :- 

" प्रणाम त्रिदेव " इंद्रदेव बोलले.

" बोला इंद्रदेव काय समस्या आहे " महादेवांनी इंद्रदेवांना विचारले.

" प्रभू रक्षा रक्षा करा ! स्वर्ग लोकातील  माझे देवराज पद आणि इत्तर देवांचे पद संकटाच्या छाये खाली आहे . ऋषीवर अत्रीमुनी ह्यांची पत्नी सती अनुसया ह्या एक पतिव्रता स्त्री आहेत . त्या त्यांच्या पती ऋषी अत्रीमुनिंची खुप उत्तम प्रकारे सेवा करतात . तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे . तिच्या ह्या पतिव्रता पावित्र्य ने त्यांच्या आश्रमात येणारे कोणीही उपाशी पोटी किंवा रिक्त हाती गेले नाही . तिचे असे सदाचरण पाहून स्वयं पंचमहाभूते ही तिच्या चरणी नतमस्तक आहेत . तिचे पतिव्रता पावित्रे बघून सूर्य , चंद्र आणि पंचमहाभूते हे भयभीत झाले आहेत . शाप भोगावे लागेल म्हणून तिला आपल्या अस्तित्वाचा जराही त्रास होऊ नये ह्याची ते दक्षता घेतात . जर सती अनुसये ने प्रसन्न होऊन कोण्या साधारण मनुष्याला इच्छित वरदान दिले तर तो आम्हा देवांचा वध ही करू शकतो . तिने जर विचार केला तर आमचे पद ही हिरावून घेऊ शकते . " इंद्रदेवांची व्यथा ऐकून त्रिदेव क्रोधित झाले . त्यांनी  सती अनुसये च्या सत्वाची परीक्षा घेण्याचे ठरवले जर सती अनुसया त्या परीक्षेत अनुत्तीर्णः झाल्या तर त्यांचे व्रत भंग करून त्यांचे वर्चस्व नष्ट करू . असे म्हणून त्रिदेव मृत्यूलोकात ( पृथ्वीवर )  आले . 



{ कथेचा मध्यभाग व त्याची सुरुवात } 

 त्रिदेवांनी तीन ऋषी मुनींच्या रूप धारण केले . शुभ्र धोतर , अंगावर रेशमी उपरणे , यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू घेऊन ते तिघे अत्रिमुनिंच्या आश्रमात आले . तेव्हा अत्रीमुनी अनुष्ठान करण्यासाठी बाहेर गेले होते . सती अनुसये माते ने बघितले त्यांच्या आश्रमात तीन ऋषी मुनी आले आहेत .

" अतिथी आपले ह्या आश्रमात स्वागत आहे " सती अनुसया माता बोलल्या.

" प्रणाम देवी , आम्ही तीन ऋषी खुप लांबून आलो आहोत . तुमच्या अश्रमाची कीर्ती आम्ही ऐकून होतो . तुमच्या आश्रमात ऋषी मुनींची सेवा होत असे . तुम्ही तुमच्या दारी आलेल्या ऋषी मुनी किंवा भिक्षुकाला इच्छितभोजनदान देता . तर त्याच हेतू ने आम्ही तुमच्या आश्रमात आलो आहोत . आम्हाला आमच्या इच्छेनुसार भोजन द्या . " त्या तीन ऋषी मुनींपैकी एक ऋषी बोलले. 

" हे ऋषी मुनी आपण आत येऊन आसनावर विराजमान व्हावे . " सती अनुसया देवी बोलल्या.

तसे ते तीन ऋषी हातपाय धुवून आश्रमात आले . सती अनुसया देवी ने त्यांना बसायला आसन ( पाट ) दिले . गंध लावलेले फुल एक जल पत्रात भिजवून सती अनुसये ने त्यांच्यावर पवित्र जल शिंपडले . तेव्हा ते तीन ऋषी मुनी बोलले " देवी आम्ही स्नान ( अंघोळ करून )  अर्पून आलो आहोत . तर कृपया आपण आम्हाला भोजन वाढावे. " . तसे सती अनुसये देवी ने त्यांच्या समोर केळीचे पान ठेवून  लगेच त्यांना जेवण वाढायला घेतले. तेव्हढ्यात, त्या तीन ऋषी मुनींनी सती अनुसये देवी ला थांबण्याचा आदेश दिला आणि बोलले :-  " हे देवी आम्ही तीन ऋषी मुनी खुप लांबून आलो आहोत . तुमचे सुंदर स्वरूप पाहून आमच्या मनी इच्छा आली आहे की आपण निर्वस्त्र ( नग्न ) होऊन आम्हास भोजन वाढावे . नाहीतर आम्ही इथून भोजन न ग्रहण करताच जाऊ . " 

ऋषी मुनींचे ही इच्छा ऐकून सती ( पतिव्रता ) अनुसया देवीच्या पायाखालची जमीन सरकली होती . त्यांच्यावर एक घोर संकट आले होते . त्यांना समजले हे कोणी कारणिक  पुरुष त्यांचे सत्व परीक्षा घेण्यास आले आहेत . सती अनुसया आता खुप मोठ्या दुविधा मध्ये पडल्या होत्या . त्या ह्या तीन ऋषी मुनींना उपाशी पोटी आश्रमातून पाठवू शकत नव्हत्या आणि त्यांची इच्छा ही नाकारू शकत नव्हत्या . शेवटी सती अनुसया देवी ने ती अग्नी परीक्षा देण्याचे ठरवले . त्या मनातल्या मनात बोलल्या :- "  जर माझे सत्व खरे असेल व माझे मन निर्मळ असेल तर मन्मथ ( कामदेव ) चा प्रभाव माझ्या मनावर जरा सुद्धा होणार नाही . माझ्या पतीचे ( ऋषी अत्रिंचे) तपफळ ( तप-सामर्थ्य ) माझ्या पाठीशी उभे आहे  ते मला ह्या परीक्षेत तारेल. "

सती अनुसया देवी ने मनाशी निश्चय केला ही परीक्षा देण्याचे आणि त्या तीन ऋषींना बोलल्या :- "   हे ऋषी मुनी तुमची इच्छा मी पूर्ण करेल . तुम्हाला मी निर्वस्त्र ( नग्न ) होऊन अन्न वाढेल . " 

एवढे बोलून सती अनुसया देवी स्वयंपाक घरात गेल्या . त्यांनी त्यांच्या पतीचे ऋषी अत्रींच्या चरणाचे चिंतन केले आणि बोलल्या अतिथी माझे बाळे आहेत . निर्वस्त्र ( नग्न ) होऊन जेवणाचे भांडे घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर आल्या तर बघतात काय ते तीन ऋषी मुनींचे तीन तान्हे बाळात परिवर्तन झाले होते . त्यांना बघून सती ( पतिव्रता ) अनसूया  देवी भयचकित झाल्या आणि पटकन स्वयंपाक घरात येऊन वस्त्रे नेसून बाहेर आल्या . ते त्या तीन बाळान जवळ गेल्या . तीन बाळ रडत होती त्यांना भूक लागली होती . सती अनसूया देवी चे पतिव्रता पावित्र्य आणि ऋषी अत्रिंच्या तपफळा ( तप सामर्थ्य ) मुळे तीन ऋषी मुनींच्या वेशात आलेल्या त्रेमुर्तींचे परिवर्तन तीन बाळान मध्ये झाले होते .  सती ( पतिव्रता ) अनसूया देवी ने त्या तीन बाळांना एक एक करून स्तनपान करविले आणि त्यांच्याशी खेळु लागली . त्यांच्यासाठी एक सुंदर गीत गाऊ लागल्या . संध्याकाळची वेळ होती . ऋषी अत्री मुनी त्यांचे अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले होते . तेव्हढ्यात त्यांना लाहांबळांच्या हसण्या खिडळण्याचा आणि सती ( पतिव्रता ) अनसूया मातेचा गाण्याचा आवाज आला . ते आश्रमात आले त्यांनी बघितले तीन तान्हे बाळ सती ( पतिव्रता ) अनसूया माते सोबत खेळत होते . ऋषी अत्रिंनी पतिव्रता अनसूया मातेला विचारले " हे अनसूया हे तीन तान्हे बाळ कोणाचे ? "  . ऋषी अत्रींच्या ह्या विचारण्यावर सती ( पतिव्रता ) अनसूया माते ने त्यांना घडलेला वृत्तान्त सांगितला . ऋषी अत्रींनी त्यांच्या तप - दृष्टीने त्या तीन बाळांकडे पाहिले त्यांना हे तीन बालक स्वयं त्रिमूर्ती ( त्रिदेव ) आहेत . ऋषी अत्रींनी त्या तीन बालकांना नमस्कार करून म्हणाले :- " हे स्वयं ब्रह्म , विष्णू , महेश आहेत  "  . तेव्हढ्यात त्या तीन बालकांमधून त्रिमूर्ती तीन दिव्य ऊर्जेच्या रुपात बाहेर पडले आणि ते तिथे प्रकट झाले . त्रिमूर्तींना पाहून ऋषी अत्रींनी आणि सती ( पतिव्रता ) अनसूया माते ने त्यांना प्रणाम ( नमस्कार )  केला .

" हे ऋषी अत्री तुमची पत्नी सती अनसूया देवी ह्या एक सत्य पतिव्रता साध्वी स्त्री आहे . ती तिच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे . आम्ही त्रिदेव तुमच्यावर प्रसन्न झालो आहोत . सांगा काय वरदान देऊ आम्ही तुम्हाला ? " 

त्रिदेवांचे हे प्रश्न ऐकून पतिव्रता अनसूया माते ने ऋषी अत्रींना पुत्र मागण्यास सांगितले . ऋषी अत्रींनी  त्रिदेवांकडे त्या तीन बालकांचे एकरूप होऊन  त्रिमूर्ती पुत्र रुपात त्यांच्या आश्रमात त्यांच्या सोबत राहवे असे वरदान मागितले . त्रिमूर्तींनी तथास्तु केले . पूर्ण तीन बालकांची रूप त्रिदेवांमध्ये एकरूप झाली आणि  त्रिदेवांनी एक रूप होऊन एका बालक रुपात प्रगट झाले . त्या बालकाचे शुभ नाव दत्तात्रेय असे ठेवण्यात आले . " दत्तात्रेय " हे नाव असून सिद्ध गुरूचे मूळपीठ तेच आहे . पुढे ब्रह्म देव बालावतार रुपात प्रगट झाले आणि त्यांची ओळख चंद्र  आणि शंकरांनी बालावतार घेऊन त्यांची ओळख दुर्वास अशी संबोधली गेली आहे . या दोघांनी पतिव्रता अनसूया माते जवळ आज्ञा मागितली . " मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल " असे चंद्र म्हणाला आणि " मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो " असे दुर्वास म्हणाला . श्री दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि सती ( पतिव्रता ) अनसूया माते सोबत आश्रमात राहिले .  


* दत्ता जन्म विषयी अजून काही प्रचलित कथा * 

प्रचलित कथा १) वैकुंठाचे अधिपती श्री विष्णूंनी अनेक अवतार घेतले जगकल्यानासाठी . तसेच दत्तात्रेय हा अवतार घेतला वाईट - दैत्य - राक्षसी प्रवृत्ती चा नाश आणि मनुष्य व इत्तर जिवमात्रांच्या रक्षणकर्ता . 

त्रिदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मा कडून सोम ( चंद्र ) , विष्णू कडून दत्त आणि शिवांकडून दुर्वास असे तीन पुत्रलाभ झाले ऋषी अत्रींना आणि सती अनसूया मातेला . 

प्रचलित कथा २) एकदा राहूने सूर्याला गिळले तेव्हा सर्व पृथ्वी अंधारमय झाली होती . मग ऋषी अत्रींनी सूर्याला राहुच्या नर्ड्यातून बाहेर काढले आणि पुन्हा पृथ्वी वर प्रकाश प्रस्थापित केले . ऋषी अत्रींच्या ह्या पराक्रमाने महादेव आणि श्री विष्णू प्रसन्न झाले व त्यांनी दत्त ( श्री विष्णू )  आणि दुर्वास ( महादेव )  ह्या रूपाने ऋषी अत्रींच्या आश्रमात जन्म घेतला . 

{वरील प्रसंगांचे संदर्भ कुठून घेतले माहीत नाही . पण इंटरनेट वर अनेकांनी हे प्रसंग त्यांच्या लेखात नमूद केले आहेत . खाली एक प्रचलित दत्त जन्म प्रसंग हा इंटरनेट वर बहुतेकांच्या लेखात ब्रह्म पुरणात नमूद आहे असे सांगितले आहे .} 

प्रचलित कथा ३ ) श्री दत्त जन्माची एक प्रचलित कथा ब्रह्मपुराणात नमूद आहे . ती अशी,  एकदा ऋषी अत्रींनीं त्रिदेवांची आराधना केली . जेव्हा त्रिदेव ऋषींच्या अराधनेने संतुष्ट झाले तेव्हा ऋषी अत्रींनीं ब्रह्मा , विष्णू आणि महेश कडे एक वरदान मागितले की त्रिदेव त्यांच्या आश्रमात पुत्र रूपाने राहतील आणि त्यांना सोबत एक रूपवती कन्या ही प्राप्त व्हावी . त्रिमूर्तींच्या आशीर्वादाने सोम , दुर्वास , दत्त असे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची  एक पुत्री प्राप्त झाली .



तर ह्या अश्या उत्तम दोन कथा आहेत दत्त गुरूंच्या जन्माच्या. इत्तर काही प्रचलित कथा आहेत पण मला श्री गुरू चरित्रातील चौथ्या अध्यायातील  कथा ही खरी वाटते . कारण श्री गुरु चरित्रातील चौथ्या अध्यायाची कथा जर खोटी अस्ती तर तो ग्रंथ पावन झालाच नसता .  तर  वाचकांनो तुम्हाला ह्या कथांमधील कुठली कथा ही बरोबर वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा . 






Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.