श्री दत्त गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे आठ पौराणिक शिष्य .
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 १) श्री दत्त अवताराचे स्वरूप . त्रिमूर्तींचे एक स्वरूप म्हणजे दत्त अवतार . दत्तात्रेयांचा अवतार हा चिरंजीवी आहे . ते कलियुगाच्या शेवटापर्यंत राहणार आहेत . दत्तात्रेय हे इसवीसनाच्या पाचव्या शतकपासून पुराणात प्रसिद्ध आहेत . दत्तात्रेये दैवत हे तीन शिरे आणि सहा हात असे दिसायला आहे . दत्तात्रेयांच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू आहे . तर मधल्या दोन हातात त्रिशूल व डमरू आणि वरच्या दोन हातात सुदर्शन चक्र आणि शंख . त्यांचे तीन शिर आणि सहा हातातल्या प्रत्येक वेगवेगळी गोष्ट हे त्रिमूर्तींना दर्शवितात . त्यांच्या सोबत एक गाय जी माता देवी पृथ्वी ला आणि चार कुत्रे जे चार वेद व महादेवाचे चार भैरव दर्शवितात . दत्तात्रेय जेव्हा सगुण अवतारात ( म्हणजे देह रुपात ) पृथ्वी वर होते तेव्हा त्या कालावधी मध्ये दत्त संप्रदाय मध्ये काही उप - दत्त संप्रदाय निर्माण झाले . ह्या सर्व संप्रदायंचे मुख्य देवता हे " श्री गुरु दत्तात्रेय " आहेत . दत्तात्रेय हे संपूर्ण