श्री दत्त गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे आठ पौराणिक शिष्य .

                               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻
           🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻


१) श्री दत्त अवताराचे स्वरूप .

त्रिमूर्तींचे एक स्वरूप म्हणजे दत्त अवतार . दत्तात्रेयांचा अवतार हा चिरंजीवी आहे  . ते कलियुगाच्या शेवटापर्यंत राहणार आहेत .  दत्तात्रेय हे इसवीसनाच्या पाचव्या शतकपासून पुराणात प्रसिद्ध आहेत . दत्तात्रेये दैवत हे तीन शिरे आणि सहा हात असे दिसायला आहे . दत्तात्रेयांच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू आहे . तर मधल्या दोन हातात त्रिशूल व डमरू आणि वरच्या दोन हातात सुदर्शन चक्र आणि शंख .  त्यांचे तीन शिर आणि सहा हातातल्या प्रत्येक वेगवेगळी गोष्ट हे त्रिमूर्तींना दर्शवितात . त्यांच्या सोबत एक गाय जी माता देवी पृथ्वी ला आणि चार कुत्रे जे चार वेद व महादेवाचे चार भैरव दर्शवितात . दत्तात्रेय जेव्हा सगुण अवतारात ( म्हणजे देह रुपात ) पृथ्वी वर होते तेव्हा त्या कालावधी मध्ये दत्त संप्रदाय मध्ये काही उप - दत्त संप्रदाय निर्माण झाले . ह्या सर्व संप्रदायंचे मुख्य देवता हे " श्री गुरु दत्तात्रेय " आहेत . दत्तात्रेय हे संपूर्ण विश्वाचे मुळ आहेत . त्यांना संपूर्ण विश्वाचे गुरुपद बहाल केले गेले आहेत. श्री गुरु दत्तात्रेय हे उत्पती, स्तिथी आणि लय ह्यांचे निर्देशक आहेत . परमात्म्याशी एक होणे , अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे तीन दत्त संप्रदाय चे प्रमुख वैशिष्ट्य आहेत . दत्त संप्रदाय हा सर्वांना जवळचा वाटतो . कारण ह्यात प्रपंच, परमार्थ आणि मोक्षाचा यथायोग्य मेळ घातला गेला होता . दत्त संप्रदाय मध्ये  प्रापंचिक उन्नती आणि त्याच बरोबर साधना , उपासना , अनुष्ठाने या द्वारे मानसिक , शारीरिक , भौतीक, कौटुंबिक ह्यांची प्रगती एकत्र उपाययोजना माणसाला मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाते .सर्व हिंदू पंथात आणि इत्तर संप्रदाय मध्ये त्यांना मुख्य देवता  संबोधले आहे . दत्त संप्रदाय शैव , शाक्त , वैष्णव आणि गांपत्य. ई. व वारकरी संप्रदायाशी खूपच जवळचा आहे . 


गुजरात च्या प्रसिद्ध दत्त भक्त श्री रंगावधूत महाराज ह्यांनी आपल्या "रंग रहस्य " स्तोत्रग्रंथा मध्ये स्वानुभुती नुसार श्री दत्ता गुरूंचा ध्यांमंत्र प्रस्तुत केले आहे . तर महानुभव नाथपंथीयानीं स्वानुभवातून श्री दत्त गुरूंना साकार केले आहे . 


२) श्री दत्त गुरूंचे महाभारतकालीन आणि दत्त उपनिषद मध्ये नोंद असलेले काही स्तुतीवंत आणि पराक्रमी शिष्य होते . ते खालील प्रमाणे :- 

१) राजा यदु

राजा यदु हे ययाती आणि देवयानी चे पुत्र . एक दिवस राजा यदु चे ययाती सोबत विकोपाचे भांडण झाले. म्हणून , राजा ययाती ने राजा यदु ला राज्या बाहेर हाकलून दिले . ( राजा यदु आणि ययाती राजा मध्ये नक्की कुठल्या विषयावरून वीकोपाचे भांडण झाले हे जाणण्यासाठी ह्या लेखाच्या शेवटी लिंक दिली आहे . त्याच्यावर क्लिक करा आणि त्यांच्या भांडणाची कथा वाचा . ) तेव्हा राजा यदु ह्यांना " श्री दत्त गुरू " कोण आहेत हे ठाऊक होते पण कधी त्या दोघांचा भेटीचा योग जुळून नाही आला . म्हणून, राज्यातून हकल्ल्या नंतर राजा यदु हे " श्री दत्त गुरूंच्या " शोधात इकडे तिकडे भ्रमण करीत होते  . जेव्हा दत्त गुरूंचा शोध घेत राजा यदु दक्षिण भारतात कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्यांना " श्री दत्त गुरूंनी " त्यांना " अवधूत " रुपात दर्शन दिले . राजा यदु श्री दत्तात्रेयांना शरणं गेले आणि त्यांच्या कडे परमज्ञान देण्याची विनंती केली . त्या वेळी श्री दत्त गुरूंनी राजा यदु ह्यांना संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्यांच्यावर पूर्ण कृपा केली . यदु राजाने त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत " श्री दत्त गुरूंची सेवा " केली . 

२) परशुराम 

ऋषी जमदग्नींच्या पत्नी रेणुका मातेचा वध . एकवीस वेळा माता पृथ्वी ला दुराचारी क्षत्रियांपासुन मुक्ती . कोकण भूमी ची निर्मिती करून श्री परशुराम ह्यांनी कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना श्री दत्त गुरूंची उपासना केली . श्री दत्त गुरूंनी परशुरामांवर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्री विद्येची उपासना सांगितली . श्री दत्त गुरू आणि श्री परशुराम ह्यांमधील संवाद " श्री दत्त भार्गवसंवाद " म्हणून प्रसिद्ध आहे . " त्रिपुरारहस्य " नावाच्या ग्रंथात हा संवाद आहे आणि त्यात श्री दत्तात्रेयांनी श्री परशुराम ह्यांना चिरंजीवीत्व प्रधान केले आहे . आजही श्री परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभुं बरोबर बद्रीनाथ जवळ बद्रिकाश्रम मध्ये आहे . ( परशुराम ह्यांच्या बद्दल पूर्ण माहिती साठी लेखाच्या शेवटी दिलेल्या दुसऱ्या अंकाच्या लिंकवर क्लिक करा . ) 

३) आयु राजा . 

महाभारत काळी पुत्र प्राप्ती साठी राजा आयु आणि त्याची पत्नी इंदुमती हे दोघे ऋषी मुनींच्या ( किंवा त्यांच्या अध्यात्मिक गुरूंच्या ) आदेशावरून " श्री दत्तात्रेयांना " शोधत होते . एक दिवस त्या दोघांना एका झऱ्या खाली " श्री दत्त गुरू " बसलेले दिसले . त्यांच्या सोबत त्यांच्या मांडीवर एक सुंदर तरुण स्त्री ही बसली होती . त्या दोघांचे मद्यपान चालू होते . त्यांच्या बाजूला कच्चे शिजवलेले मांस ही होते . त्या दोघांना ह्या परिस्थिती मध्ये पाहून सुद्ध राजा आयु ने दत्त प्रभूंना विनम्रपणे प्रार्थना केली . तेव्हा हसून श्री दत्त गुरू म्हणाले :- " अरे, मी तर असा दुराचारी आहे . तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही . मला मांस , मद्य( मद्य म्हणजे आजच्या भाषेत ' वाइन ' ) आणि स्त्री लागते . तू कुठल्यातरी दुसऱ्या ब्रह्मनाकडे जा तुझ्या कामनापूर्ती साठी .  "  

तेव्हा आयु राजा म्हणाला :- " हे प्रभू , ह्या संपूर्ण सृष्टी मध्ये तुमच्या सारखा ब्राह्मण कोणी नाही आहे . तुम्ही स्वयं श्री विष्णूंचे अवतार आहात . ब्रह्मांडाचे मालक आहेत . " 

तेव्हा श्री दत्तात्रेयांनी त्याचा अपमान करून त्याला हाकलून दिले . पण तरीही राजा आयु तिथून गेला नाही . अशी हजारो वर्ष गेली . राजा आयु आश्रमात राहून श्री दत्त गुरूंची सेवा करत होता . 

एक दिवशी , श्री दत्त गुरू राजा आयु ला बोलले :- " आयु मला मद्य( वाइन) आणि शिजवलेले मांस आणून दे ." दत्त गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा आयु ने लगेच मद्य(वाइन) आणि शिजवलेले मांस दत्त गुरूंना आणून दिले . राजा आयु च्या भक्तीने श्री दत्तात्रेय खुप प्रसन्न झाले होते . त्यांनी त्याच्या समोर रचलेली दुराचारी व्यक्तिमत्वाची माया नाहीशी केली आणि त्याला वर मागण्यास सांगितले . तेव्हा आयु राजा ने वर मागितला :- " हे प्रभू मला असा पुत्र द्या जो पराक्रमी आणि संपन्न असेल . जो त्याच्या प्रजेची काळजी करणारा , देवांची भक्ती करणारा आणि ब्राह्मणांचा आदर करणारा असेल . जो गरिबांना अन्नदान , यज्ञ याग आणि दिव्य ग्रंथांचा अभ्यास करणारा असेल . " 

श्री दत्त गुरूंनी "तथास्तु" म्हणत राजा आयु ला त्याला इच्छित वरदान दिले व त्याला एक फळ दिले आणि सांगितले :- " आयु हे फळ तुझ्या पत्नीस खायला दे . तुला तुझ्या इच्छे प्रमाणे पुत्र प्राप्त होईल . " 

एवढे बोलून श्री दत्त गुरू अदृश्य झाले . राजा आयु ने ते फळ त्याच्या पत्नीस खायला दिला . ( ह्या पोस्ट मध्ये मी ही कथा संपूर्ण नाही टाकली आहे . राजा आयु व त्याची पत्नी इंदुमती ह्यांच्या पुत्राची संपूर्ण जन्म कथा मी एका दुसऱ्या पोस्ट मध्ये टाकली आहे . त्याची लिंक मी खाली दिली आहे . ) फळ खाल्यानंतर काही दिवसात त्या दोघांना एक पुत्र लाभ झाला . त्याचे नाव नहुष असे ठेवण्यात आले . 


४) पुरुरवा

जन्मापासून कुरूप स्वरूपामुळे( कुरूप दिसण्यामुळे) राज पुत्र असून ही पुरुरवा ला कोणी विवाह योग्य मानत नसे . त्याला कुठल्यातरी शापामुळे कुरूप स्वरूप मिळाले होते . सर्वजण त्याची चेष्टा करत असे . तो युवराज झाला होता . सोबत त्याच्या लग्नाचे वय देखील झाले होते . कुठल्याही वधुपिता ने जरी लग्नाची तयारी दाखवली तरी प्रत्यक्षात मुलगी त्याला नकार देत असे . म्हणून , पुरुरवा निराश झाला होता त्याच्या स्वरूपामुळे . शेवटी त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला . तो अत्रि ऋषींनी जिथे तपश्चर्या केली होती तिथे आला . त्याने तपश्चर्या सुरू केली . तेव्हाच त्याला " श्री दत्त गुरूंनी "दर्शन दिले . श्री दत्त गुरू पुरुरवाला म्हणाले :- " जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे . ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रात खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लीला आहेत . " श्री दत्त गुरूंनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह केला . श्री दत्त गुरूंनी पुरुरवाला त्याच्या समस्येतून मुक्त होण्याकरता श्रीदेवीची उपासना करण्याचा मार्ग सांगितला . श्री दत्त गुरूंची आज्ञा मान्य करून पुरुरवा ने देवीची उपासना प्रारंभ केली . त्याच्या प्रखर उपासने मुळे त्याच्यावर श्रीदेवी प्रसन्न झाली आणि त्याला सुंदर स्वरूप प्राप्त झाले . पुरुरवाने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी दत्त चरणी मोक्षधामी गेला . 


५) कार्तवीर्य अर्जुन 

कृतयुगातील राजा कृतविर्य आणि त्याची पत्नी महाराणी शिलधरा ह्यांचा पुत्र कार्तवीर्य अर्जुन होता . ( कार्तवीर्य अर्जुनाची जन्म कथा मी दुसऱ्या  पोस्ट मध्ये टाकली आहे . जन्म कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा.  ) कालांतराने जेव्हा राजा कृतविर्य सर्व राज्य कारभार कार्तवीर्य अर्जूनावर सोडून अरण्यात निघून गेला . तेव्हा एक दिवस धर्मयुक्त राज्य कसे करावे , राज्य विस्तार कसे करावे, राजधर्म आणि प्रजाधर्म कसे करावे आणि सांभाळावे या बद्दल राजा कार्तवीर्य अर्जुनाला प्रश्न पडला होता. तेव्हा कार्तवीर्य अर्जुनाने गर्गमुनिंचा सल्ला घेतला . गर्गमुनिंनी कार्तवीर्य ला सांगितले :- " कार्तवीर्य अर्जुना तुला तुझ्या शंकांचे समाधान करायचे असेल तर "श्री गुरू दत्तात्रेयांची " उपासना कर . तेच तुला रज्यधर्माचे  यथार्थ ज्ञान देतील ." गर्गमुनींनी सुचवलेल्या मार्गाने जात कार्तवीर्य अर्जुन  श्री दत्त गुरूंच्या आश्रमात गेला . कार्तवीर्य खुप महत्त्वाकांक्षी आणि दृढ़ निश्र्चयी होता . संपूर्ण पृथ्वीचे अधिपत्य प्राप्त करण्याची त्याची इच्छा दूढ होती . त्यासाठी तो वाटेल तेवढे परिश्रम करायला तयार होता . कार्तवीर्य अर्जुन श्री दत्त गुरूंच्या आश्रमात आला त्याने दत्त गुरूंना त्याची शंका आणि इच्छा व्यक्त करून सांगितली . तेव्हा श्री दत्त गुरू त्याला म्हणाले :- " मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा " . श्री दत्त गुरूंनी कार्तवीर्य अर्जुनाला असे बोलून निरुत्साही केले . पण तरीही कार्तवीर्य दृढ़ निश्चयाने दत्त प्रभूंची सेवा करीत आश्रमात राहिला . कार्तवीर्य अर्जुनावर एक वेळ अशी आली की त्याने दत्तात्रेयांच्या इच्छे विरुद्ध त्यांची सेवा करत राहिल्याने श्री दत्त गुरूंनी त्यांच्या क्रोधागणीने त्याचे दोन्ही हात जाळून भस्म करून टाकले . त्याला खुप वेदना झाल्या पण तरीही तो श्री दत्त गुरूंची सेवा करीत तिथेच राहिला . त्याने त्याच्या मनातला श्री दत्त गुरूंच्या सेवेचा भाव जराही कमी नाही केला . कार्तवीर्य अर्जुनाचा सेवा भाव आणि त्याची श्रद्धा पाहून श्री गुरु दत्तात्रेय त्याच्यावर खूप प्रसन्न झाले . श्री दत्त गुरूंनी कार्तवीर्य अर्जुनाला यथार्थ ज्ञान, योगज्ञान आणि ब्रह्म ज्ञान ही दिले . धर्माचा उपदेश दिला आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य बहाल केले . " श्री दत्त गुरूंनी " कार्तवीर्य अर्जुनाच्या दोन नष्ट झालेल्या हातांच्या ऐवजी त्याला सहस्र बाहू ( एक हजार हात )  प्रदान केले .त्याच बरोबर त्याला अनेक सिद्धी , शस्त्रे आणि अस्त्रे दिली . कार्तवीर्य अर्जुनाच्या एक हजार हतांवरून त्याला " कार्तवीर्य सहसरार्जून "  म्हणून नाव पडले . कार्तवीर्य " श्री दत्त गुरूंचा " प्रिय शिष्य झाला होता . तो श्री दत्त गुरूंची मनोभावे सेवा करत होता . त्याने शंभर वर्षांहून अधिक राज्य केले . 


६) अलर्क

[ ह्या विषयावर मी जरा अभ्यास ( रिसर्च) केला.  मला असे माहीत पडले की अलर्क राजाच्या कथेची नोंद मार्कंडेय पुराणामध्ये आहे . प्राचीन भारतामध्ये अलर्क राजाच्या आयुष्यात एक घटना घडली आणि तेव्हा पासून त्याची कथा प्राचीन भारत ते आता चालू युगापर्यंत तरी खरे सनातन इतिहासकार , आपल्या घरातील वृद्ध व गावातील माणसांमध्ये  ( जर गावातील माणसांना ती कथा माहीत असेल तर हा ! ) प्रसिद्ध आहे . ] 

प्राचीन काळात विश्वासू नावाचा एक राजा होता . तो एक प्राचीन गंधर्व आहे . त्याची एक मुलगी होती " मदलसा " नावाची . तिचे लग्न रितुध्वज नावाच्या राज्याशी झाले . नंतर त्या दोघांना चार मुलं झाली . ( राजा रितुध्वज आणि राणी मदलसा च्या लग्नाची आणि त्यांच्या चार मुलांच्या जन्माची एक वेगळी रंजक कथा आहे . ती कथा वाच्ण्याकरता लेखाच्या खालील लिंकवर क्लिक करा आणि वाचा. ) मदलसा राणी च्या चौथ्या मुलाचे नाव अलर्क असे होते . मदलसा राणी अलर्का च्या लहानपणी त्याच्या साठी एक अंगाई गीत गाईची त्यात ती त्याला शौऱ्यता आणि धार्मिकते बद्दल समजावून सांगायची .नंतर अलर्क मोठा झाला . तेव्हा राणी मदलसा त्याला राजधर्म आणि संसारधर्मा बद्दल ज्ञान ( म्हणजे शिकवीत ) देत असे . जसे एका राजाचे त्याच्या संपूर्ण राज्याप्रती असलेले  " कर्तव्य " आणि जसे एका गृहस्थाचे त्याच्या संसाराप्रती असलेले " कर्तव्य " . तिने अलर्का ला धर्म(धर्माधिष्ठीत जीवन) , अर्थ(धार्मिक कारणांसाठी संपत्ती) आणि कामं(योग्य इच्छा) बद्दल सांगितले .  बघता बघता  अलर्का ने लग्न केले . राजा रितुध्वज आता वृद्ध झाला होता . त्याने अलर्काला राज्याच्या नवीन राजा म्हणून घोषित केले . अलर्काचे राज्याभिषेक होताना राणी मदलसा तिथे उपस्थित होती . तिने अलर्का ला राज्याभिषेक झाल्यानंतर एक एक "सोन्याची अंगठी " दिली . राज्याभिषेक नंतर राजा रितुध्वज आणि राणी मदलसा ह्यांनी सर्व राजसुखांचा त्याग करून "वानप्रस्थ"(सर्व राज सुखांचा त्याग करून अरण्यात राहण्यास जाणे) ला निघाले . 


राजा अलर्का ने खुप वर्ष कुठली ही भीती कष्याबद्दल ची न बाळगता उत्तम राज्य केले . सर्व प्रजेत तो कीर्तिवंत झाला होता. सर्व प्रजा सुखी होती . त्या दरम्यान राजा अलर्का ला खुप मुलं झाली. सर्व सुख संपन्न असून पण राजा अलर्क ला आंतरिक आनंद भेटत नव्हता . त्याच्या मनात नेहमी काही शंका उत्पन्न व्हायच्या .  सुवाहू राजा अलर्क चा मोठा भाऊ जो खुप आधीच संन्यास घेऊन जंगलात निघून गेला होता . त्याला असे कळाले की राजा अलर्क खुप उत्तम प्रकारे राज्य कारभार सांभाळतोय. पण तेवढाच राजेशाही , भोग ,विलास जीवन जगतोय . आधितर , सुवाहु ला राजा अलर्क वर अभिमान वाटला पण नंतर त्याला अलर्का चे राजेशाही जीवन हवेसे झाले . त्याच्या मनात राजा अलर्क च्या प्रती मत्सर उभा राहिला . सुवाहू ला एक कपट युक्ती सुचली . तो राजा अलर्क चा शत्रू काशीराजाची ( म्हणजे काशी राज्याचा राजा ) मदत घेतली . काशीराजाने सुवाहूच्या सांगण्यावरून एक पत्र लिहिले आणि ते राजा अलर्क ला पाठवले . राजा अलर्क ने ते पत्र वाचले . त्यात असे लिहिले होते की " त्याने त्याची सर्व संपत्ती आणि संपूर्ण राज्य सुवाहू द्यावे "   .साहजिकच,  राजा अलर्क एवढ्या सहजासहजी आपले  कर्त्यव विसरून असेच संपूर्ण राज्य कोणाला ही देणार नव्हता .  त्याने एक नकार पत्र काशी राजाला ही पाठवले .  त्यात लिहिले होते " मी तुमच्या ( काशी राजा आणि सुवाहू ) ला घाबरून माझे राज्य असेच तुमच्या हवाली नाही करणार . माझ्या भावाने ( सुवाहूने ) त्याचा हक्क नम्रतेने आणि (प्रेमाने ) मागावा. " . 


राजा अलर्क चे नकार पत्र वाचून सुवाहू ने काशी राजा च्या मदतीने राजा अलर्क वर आक्रमण केले . दोन्ही राज्यांमध्ये मोठे युद्ध झाले पण राजा अलर्क हरला गेला आणि त्याच्या हातून त्याचे राज्य गेले .तो खुप दुःखी झाला होता . तेव्हढ्यात त्याला त्याच्या आईचे (मदलसा चे) शब्द आठवले . त्याने  मदलसा(आईने ) ने दिलेली अंगठी बघितली . त्यात एक लहान बारीक खाच होती . त्याने ती खाच उघडली आणि त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली . त्या चिठ्ठीत संस्कृत मध्ये असे लिहिले होते :- " सर्व संकटांचे मुळ कारण ही इच्छा आहे . जेव्हा तू प्रदीर्घ काळ राज्याचा उपभोग घेशील किंवा तू तुझ्या आयुष्यातले सर्वस्व गमावशील तेव्हा आसक्ती , संसार आणि हा समाज पूर्णपणे सोड . जर तुला ते शक्य नसेल तर तू तुझ्या सध्याच्या सल्लागारांची संगत सोड आणि साधुपुरूषांच्या संगतीत जा. तेच तुझ्या जखमेवर ( संकट , शंका ) औषध आहे . सर्वात मोठी इच्छा ही मुक्त होण्याची इच्छा आहे . साधुपुरूषच तुला मुक्ती चा मार्ग दाखवतील .   " साधू पुरुषांची संगत ऐकून अलर्काला श्री दत्त गुरू ध्यानी आले . तो लगेच दत्त गुरूंच्या आश्रमात आला आणि त्यांना शरण गेला . त्याने स्वतःच्या शंका कुशंका आणि घडलेल्या सर्व घटना त्यांच्यासमोर मांडल्या . श्री दत्त गुरूंनी अलर्का ला शांत केले आणि बोलले :- " हे अलर्का परमशक्तिशी एकरूप झाल्यानंतर मनुष्य ज्ञान आणि शेवटी मोक्षाला प्राप्त होतो . परमात्म्याशी एकरूप होण्याचा दोन मार्ग किंवा दोन प्रकार बोला . पहिले जेव्हा मनुष्य ज्ञान प्राप्ती करतो तेव्हा त्याचे अज्ञान नष्ट होते त्याने तो परमात्म्याशी एकरूप होतो  आणि दुसरे असे की मनुष्य जेव्हा प्रापंचिक संसारातील वस्तू आणि त्याच्या  प्रियाजनांसह जवळच्या लोकांबद्दल ममता व आसक्ती सोडून देतो . सर्व बंधने सोडून देतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होतो. 

ज्ञान आणि त्याग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एक दुसऱ्याला जन्म देण्यासाठी आवश्यक आहे . तसे घर ने काही नाही फक्त राहण्याचे ठिकाण , अन्न हे अजून काही नसून शरीराला जिवंत ठेवणारी ऊर्जा आहे , ज्ञान हे अजून काही नसून मोक्षप्राप्तीसाठी मदत करणारा मार्ग आहे . मोक्षप्राप्ती च्या मार्गात जो काही अडथळा येतो तो अज्ञान आहे . तुम्हाला तुमच्या कर्मांचे फळ मिळणे हे बंधनकारक आहे मग ते वाईट असो किंवा चांगले . त्यामुळे मनुष्याने त्याने केलेल्या कर्मांच्या फळाची अपेक्षा न करता त्याचे कर्तव्य करत राहवे . पूर्व जन्मी केलेल्या वाईट चांगले कर्मांच्या भोग भोगून झाल्यानंतर व या जन्मी केलेले कर्मांवर निश्चित होते की मनुष्याला मोक्ष भेटणार की पुढील जन्म . योगाची ( योग मार्गाची ) प्राप्ती झाल्यावर योगी ब्रह्मशिवाय इत्तर कुठेच आश्रय घेत नाहीत . पण योग साधनेचा मार्ग अशक्य नसला तरी कठीण आहे . मनुष्याला सर्वप्रथम त्याच्या आत्म्याला जिंकावे कारण आत्मा हा अजिंक्य मानला जातो . प्राणायामच्या साहाय्याने शारीरिक दोषांवर , निश्चयाने पापांवर , आत्मसय्यामाने वासनेवर नियंत्रण करणे आणि ईश्वराचे चिंतन हे आत्म्याला जिंकण्याचे मार्ग आहेत . ....." 

दत्तात्रेयांनी अलर्का पूर्ण ज्ञानाचा अनुग्रह केला .  नंतर अलर्क परत त्याच्या राज्यात जे त्याच्या मोठ्या भावाने सुवाहू ने काशी राजाच्या मदतीने जिंकले होते तिथे गेला . अलर्का ला भेटून सुवाहू ला समजले की श्री दत्त गुरूंनी अलर्क वर अनुग्रह केला आहे . त्याच्याने सुवाहू ला त्याची चूक कळाली . त्याने ते सर्व राज्य अलर्क ला परत केले आणि तो तिथून परत अरण्यात निघून गेला . पण अलर्का ने राज्य त्याग केला होता . काशी राजाला त्याने केलेल्या सुवाहू च्या मदतीवर पश्चाताप झाला आणि तो ही ते राज्य सोडून स्व:राज्यात परतला . अलर्का ने ते सर्व राज्य त्याच्या मोठ्या मुलाच्या हाती सोपवले . मोठ्या मुलाला राजा बनवून तो पण राज्य सोडून मोक्षाच्या वाटेवर गेला . 

७) प्रल्हाद 

विष्णू अवतार नरसिंह भक्त प्रल्हाद तर सर्वांना ठाऊक आहे . त्याची नारायण भक्ती , त्याच्या भक्ती ची परीक्षा , त्याचे भोग , हिरण्यकश्यपू , नरसिंह अवतार प्रकटने आणि हिरण्यकश्यपू चा वध . ही प्राचीन पौराणिक कथा सर्वांना ठाऊक आहे . पण प्रल्हाद आणि दत्त गुरूंच्या भेटीची कथा क्वचित वाचकांना माहीत असेल .  ह्या कथेचा उल्लेख महाभारतातील शांती परवाच्या अध्याय १७९ ते अध्याय १७९:३ मध्ये भीष्म आणि युधिष्ठिराच्या संवादात आहे . 


जेव्हा युधिष्ठिराने पितामह भीष्म यांना प्रश्न केला की " हे पितामाह भीष्म तुम्ही तर खुप व्यक्तींच्या आच्रणांशी परिचित आहात. मला सांगा एका व्यक्तीने कुठले आचरण धारण केल्याने तो त्याच्या आयुष्यात दुःख मुक्त होतो आणि एकाध्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात कसे वागले पाहिजे ज्यानेकरून त्याला एक उत्तम अंत प्राप्त होईल ? " 

युधिष्ठिराच्या ह्या प्रश्नावर पितामह भीष्म बोलले " युधिष्ठिरा तुझ्या ह्या प्रश्नांच्या संबंधित मी तुला एक जुणी कथा सांगतो . ही कथा राजा प्रल्हाद आणि ऋषी अजगर बद्दल आहे आणि ती खुप प्रचलित आहे . 

एक राजा म्हणून प्रल्हादाने खुप सुख उपभोगले पण त्यातही तो श्री विष्णूंची भक्ती ही उत्तम प्रकारे करत होता .  जगाच्या दृष्टिकोनातून त्याला कष्याची ही कमतरता नव्हती . पण , कोठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात एक असंतोषाच्या काट्याने जन्म घेतला होता आणि तो हळू हळू वाढत त्याला त्रास देत होता . प्रल्हादाला खुप प्रश्न पडायची त्याने त्याचे मन अस्वस्थ व्हायचे जसे " ह्या जगाचे मूलभूत स्वरूप काय आहे ? , माझे ( म्हणजे प्रल्हादाचे ) खरे स्वरूप काय आहे ? आणि काही वेदांविषय प्रश्न पडायची . ही सर्व प्रश्र्ने राजा प्रल्हादाला गोंधळात टाकायचे . नंतर  त्याच्या मंत्री सभेतील काही  राज विद्वानांच्या सल्ल्या नुसार प्रल्हाद त्याच्या प्रश्र्नांची उत्तर शोधण्यास  देश प्रवास सुरू केला .  प्रवास कालावधीत तो दक्षिण भारतात सह्याद्रीच्या कावेरी नदी काठी आला . 


कावेरी नदीच्या काठावर प्रल्हादाला एक गृहस्थ माती आणि चिखलात लोळताना दिसले .प्रल्हादाला  त्या गृहस्थाचे शरीर सोन्यासारखे चमकताना दिसले . आयुष्यभर हरी भक्ती केल्या कारणाने त्याला समजले हे गृहस्थ कोणी साधारण व्यक्ती नाही .  त्याला दिसले काही लोक त्या गृहस्थाला नमस्कार करत होते तर काही फटकारत होते .  त्याला समजले हे गृहस्थ कोणी थोर ऋषी मुनी आहेत . त्याला लांबून नीट काही दिसत फक्त त्या ऋषींच्या सोन्यासारख्या चमकणारे शरीर सोडून . प्रल्हाद   ताबडतोब त्या ऋषींच्या जवळ गेला आणि बोलला " हे ऋषिवर माझ्या काही क्षंका आहेत त्यांचे निरसन करा . हे महात्मा तुम्ही खुप विचित्र दिसत आहात . तुम्ही जरी माती आणि चिखलात लोळत आहात तरी ही तुमचे शरीर सोन्यासारखे चमकत आहे . ह्याचे कारण काय आहे ? .

तुम्हाला काही वेगळे गुण अवगत आहेत . तुम्ही एक मितभाषी आहात . काही व्यक्ती तुमचे रूप पाहून तुमचा तिरस्कार करतात तर काही व्यक्ती तुम्हाला साष्टांग दंडवत ( नमस्कार करतात ) घालतात , पण तुम्ही दोघांच्याही बाबतीत तटस्थ भूमिका निभावता. ना पहील्याला ओरडत ना दुसऱ्याला आशीर्वाद देत . तुमचे आचरण जगाच्या पद्धतीच्या विरुद्ध आहे . तुम्ही धार्मिकतेच्या नियमांनीही बांधलेले दिसत नाही . कृपया मला तुमच्या ह्या अच्रणाचे सत्य सांगा . " 

ऋषी राजा प्रल्हादाला बोलले की त्याच्या मनात ह्या जगाच्या स्वभावाविषयी जी काही शंका आहे ती तो एका अनैतिक वृत्तीने ( असंसारिक वृत्तीने ) दूर करू शकतो . 

ऋषी पुढे बोलले :- " हे प्रल्हादा माझ्या आठवणीत  मी ह्या जीवसृष्टी मध्ये घेतलेले अनंत जन्म आहेत .कुठल्या ही धार्मिकतेचा आणि अधारमिक्तेचा विचार न करता  मी प्राणी , पक्षी आणि किटक असे अगणित विचित्र जन्म घेतले. त्या त्या जन्मात मी विविध इच्छांना बळी ठरलो आहे . पण ह्या जन्ममृत्यू च्या कालचक्रात मनुष्य जन्म हा सर्वात श्रेष्ठ जन्म आहे . 

मनुष्य जन्म हा अनंत आनंद तसेच अनंत दुःखाचे ही द्वार आहे . ही जीवसृष्टी एक प्रवास आहे . हा प्रवास सुख-दुःख , प्रपंच-परमार्थ, पुण्य-पाप कर्म , चांगले-वाईट पूर्व संचित विश्वास - निश्चय आणि धर्म-अधर्म ह्या सर्व घटकांच्या आधारे अनंत काळ चालत राहतो . निवड मनुष्याची आहे की त्याने पुण्य कर्म करावे की पाप कर्म करावे . पुण्य कर्म केल्याने वर्तमान जन्मात तो चांगले भोग भोगतो , आगामी जन्मात ( आहे तो जन्मानंतर चा जन्म )  तो चांगल्या पूर्व संचीता नुसार उत्तम भोग भोगतो किंवा तो मोक्षाला ही प्राप्त होतो आणि जर त्याने पाप कर्म केले तर आहे त्या जन्मात तो त्याने केलेल्या पाप कर्माचे फळ त्याच्या जीवनाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन खुप प्रखरतेने भोगतो किंवा पूर्व जन्मात केलेले पाप कर्म तो त्याच्या वर्तमान जन्मात वाईट भोग म्हणून भोगतो .  

म्हणूनच , पाप कर्म हे चिरंतर यातनांचा मार्ग देते तर पुण्य कर्म हे अनंत सुखाचा मार्ग देते . 

प्रल्हादा, प्राण्यांची उत्पत्ती ,त्यांची वाढ , क्षय आणि मृत्यू कुठल्याही कारणाने शोधता येत नाही . म्हणून मी आनंदात आणि दुःखात वावरत नाही . ह्या ब्रह्मांडात प्राण्यांच्या कृतीसाठी सर्व प्रवृत्ती त्यांच्या त्यांच्या स्वभावात आहेत . विश्वात प्राण्यांच्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहेत .

प्रल्हादा ह्या ब्रम्हांडात गुणांनी युक्त असलेल्या सर्व गोष्टींचा विनाश अटळ आहे . म्हणून मी कुठल्याच गोष्टीत मनाने अडकून बसत नाही . स्थिर आणि अस्थिर ह्या भुमिशी संबंधित असलेल्या सर्व जीवांचा , गोष्टींचा मृत्यू मी पाहू शकतो . ह्या जगात सर्व गोष्टींचा विनाश निश्चित आहे . भूमिशी निगडित असोवा आकाशाशी सर्वात बलवान प्राण्यांना ही मृत्यू येतो सर्व ऋतूत . ह्या पृथ्वी वरील सर्व जीवजंतू त्यांची त्यांची वेळ आल्यावर देहत्याग करतात मृत्यूला प्राप्त होतात .  

तुला माहित आहे . मी तुला किंवा तुझ्या सारख्या हुशार व जिज्ञासू व्यक्तींना एवढा स्थिर का दिसतो ? कारण मी अजगर व्रताचे पालन करतो . 

म्हणून मी कोणतीही चिंता न करता शांतपणे झोपतो . जर मला सहज कोणतीही मेहनत न करता खुप प्रमाणात जेवण भेटले तर मी त्या जेवणाला नाकारत नाही . तर एकीकडे मी काही न खाता पिता खुप दिवस राहू शकतो . कधी कधी लोक मला महागडे स्वादिष्ट जेवण देतात त्यात ही मात्रा कमी जास्त होते . तर कधी कधी मला काहीच नाही भेटत . मी कधी कधी एक प्रकारचे धान्य खातो तर कधी कधी तिळाच्या सुकलेल्या पोळ्या ज्याच्यातून तेल काढून दिलेल्या असतात .मी काही वेळेला भात आणि त्यासारखे ईत्तर श्रीमंत पदार्थ खातो . एका क्षणाला मी उत्तम प्रकारच्या पलंगावर झोपतो तर दुसऱ्या क्षणाला मी जमिनीवर झोपतो . काही वेळेला माझ्या झोपण्याची सोय मोठ्या राजवाड्यात किंवा वाड्यात एका चांगल्या पलंगावर केली जाते . 

मी कधीच एका वस्त्रात नसतो मी अनेक वस्त्र परिधान करतो जसे चिंध्या चिंध्या झालेले वस्त्र , गोणपाट , सुबक वस्त्र आणि महागडे वस्त्र .  काही वेळेला हरणाचे कातदे ही .जे भोग सदाच्रणाशी अनुरुप आहेत आणि ते मला न प्रयत्न करता मिळाले आहेत त्यांचा मी कधीच अस्विकार करत नाही . ज्या वस्तू मिळवणे कठीण आहे , त्या वस्तुंसाठी मी कधीच धडपडत नाही . म्हणून ह्या व्रताला अजगर व्रत असे म्हणतात . जे लोक ह्या व्रताचे पालन करत नाहीत ते मूर्ख आहेत . ह्या व्रताच पालन करत असताना माझे कधीच विचलित होत नाही म्हणून मी शुद्ध अंतःकरणाने व्रताचे पालन करतो. 

मी ह्या व्रताच्या नियमांच्या विरुद्ध गेलो नाही आणि प्रत्येक गोष्टीशी निष्ठावान राहतो.मला तिन्ही काळांचे ज्ञान आहे . षद्रीपू आणि निर्णयांच्या चुकापसून मी लांब राहतो . ह्या व्रतामुळे अन्नाचे आणि इत्तर उपभोगांच्या वस्तूंसाठी मी बंधनमुक्त आहे. नशिबात जे लिहिलंय तेच घडणार आहे म्हणून हे व्रत पालन करणाऱ्यांसाठी कोणतीही एक जागा किंवा वेळ नसते . पुरुष कामुक्तेचे शिकार होतात व वेगवेगळ्या समृद्धीसाठी धडपडतात पण जेव्हा त्यांचे लक्ष असाध्य होते तेव्हा त्यांना दुःख गाठते . 

माझ्या निरीक्षणानुसार मनुष्य जेव्हा संकटात सापडतो तेव्हा तो धनप्राप्तीसाठी , इतर माणसांचा निवारा , चांगले - वाईट ह्यांचा शोध घेतो . प्रारब्ध वास्त्विक्तेच्या माध्यमातून सुख - दुःख , हानी - लाभ , आसक्ती - त्याग , जीवन आणि मृत्यू  ह्यांची ओळख करून देते. जे मनुष्य विवेकशील , हुशार व समंजस आहेत ते नेहमी भीती, आसक्ती आणि निर्णय व अहंकाराच्या चुकांपासून दूर असतात . जसे एक साधारण सापांच्या तुलनेत अधिक मोठा साप स्वतःच्या शरीराची जास्त हालचाल न करता त्याच्या जवळ स्वतःहून जे अन्न(त्याचे शिकार) येते ते तो ग्रहण करतो आणि त्याच्यातच समाधानी राहतो . 


मी अन्न आणि निद्रा ह्यांच्या विषयी कुठल्या ही प्रकारच्या प्रतिबंधपासून दूर आहे आणि आयुष्यभर केलेल्या कर्मांच्या फळांची अपेक्षा ही करत नाही . इच्छा ह्या घटकाचा मी त्याग केला आहे म्हणून , दुःखांचे कारण माझ्या पासून दूर झाले आहेत . माझे हृदयी , मन आणि शब्द ज्या सुखकारक गोष्टींकडे मला घेऊ जाऊ पाहत आहेत , त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो . कारण त्या सुख कारक गोष्टी प्राप्त करणे कठीण आणि क्षणभंगुर दोन्ही आहे . जे व्यक्ती प्रचंड बुद्धिमान आहेत . ते म्हणतात की त्यांनी ह्या व्रताला पूर्णपणे समजून घेतले आहे म्हणतात व ह्या किंवा इतर कुठल्याही विषयावर स्वतःचे सिद्धांत सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांच्या सिद्धांताची निंदा करतात , ह्या विषयावर त्यांनी असमर्थ विवादाच्या पद्धतीने हे आणि ते म्हटले आहे . ते व्यक्ती ह्या व्रताला समजण्यास असमर्थ ठरतात व ते मूर्ख ह्या श्रेणीत बसतात . 
एका दिव्य प्रकाशाला स्वतःमध्ये स्थान दिल्यामुळे , मी माझ्या अनियंत्रित पण स्वालंबी आत्म्याला नियंत्रित करण्यासाठी, आत्मनिग्रह , शुद्ध व्रत , वास्तविकता , उत्तम आचरण सोबत , मी शुद्ध अंतःकरणाने ह्या व्रताचे पालन करतो.  हे अजगर व्रत अम्रत्वाने भरलेले आहे . हे व्रत विविध प्रकारच्या दुष्कृत्यांवर उपाय म्हणून सिद्ध होते. ह्या अजगर व्रतामुळे मी माझ्या सर्व दोषांना वश केले आहे आणि सांसारिक मायेतून स्वतःला मुक्त करून ह्या माणसांमध्ये वावरतो . जो व्यक्ती स्वतःला आसक्ती , भय , क्रोध , मूर्खपणा आणि लोभ पासून मुक्त करतात ते हे अजगर व्रताचे पालन करतात . ते निश्चित त्यांचे प्रत्येक दिवस आनंदात घालवतात . " 


अजगर ऋषींचे उत्तर आणि अजगर व्रताचे महत्व ऐकून प्रल्हादाचे  सर्व शंका दूर झाल्या होत्या आणि त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी आता बदलली होती . प्रल्हादाने डोळे मिटले आणि त्या अजगर ऋषींना शरण गेला . जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला एक दिव्य प्रकाश डोळ्यासमोर  जसजसे प्रकाश कमी झाला त्याला दिसले स्वयं दत्त प्रभू त्याच्या समोर चेहऱ्यावर सौम्य स्मित करत हातात मिठाई घेऊन उभे होते . दत्त प्रभूंनी प्रल्हाला मिठाई भरवली . प्रल्हादाने नंतर आयुष्यभर दत्तप्रभुंची भक्ती आणि सेवा केली .  

( पितामह भीष्म आणि युधिष्ठिराचे संवाद इथेच  संपूर्ण होतो . ) 


८) सांस्कृती 

सांस्कृती हा दत्तगुरुंचा निस्सीम भक्त होता . तो श्री दत्तगुरुंची उपासना व साधना करायचा . त्याच्या ह्या नित्य सेवेवर प्रसन्न होऊन एक दिवस दत्त गुरूंनी त्याला दर्शन दिले . सांस्कृती खुप खुश झाला होता . तेव्हा सांस्कृती ने दत्त गुरूंना दोन प्रश्न विचारले  . पहिला असा की अवधूतानची चिन्हे , लक्षणे काय आहेत  आणि ते ह्या संसारातून कसे जातात ? . दुसरा प्रश्न असा की अष्टांग योगचे रहस्य काय ? दत्त गुरूंनी सांस्कृती ला त्याच्या दोन्ही प्रश्नांचे उत्तरे दिली .  " श्री अवधुत्तोपनिषद " ह्या उपनिषद मध्ये असे नोंद आहे की श्री दत्त गुरूंनी सांस्कृती ला अवधूतांबद्दल संपूर्ण ज्ञान दिले .  आणि "श्री जबालादर्शोपनिषद" बद्दल सांगून त्याला अष्टांग योगच्या ज्ञानाचा बोध केला. 


श्री दत्ता अवताराच्या स्वरूपाची माहिती आणि त्यांचे रामायण महाभारतकालीन आठ शिष्यांची कथा कशी वाटली हे मला तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा .

तुम्हाला जर दत्त जन्म कथा वाचायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि दत्त जन्म कथा वाचा .👇🏻👇🏻👇🏻


HOME
HOME ]


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.