खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.
🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻
1) चंपा षष्ठी म्हणजे काय ?
चंपा षष्ठी हा भगवान शंकरांच्या अवताराला खंडोबाला समर्पित आहे . चंपा षष्ठी च्या ह्या दिवशी भगवान खंडोबा ह्यांनी मणी मल्ला असुर ह्यांचा वध केला . त्या असुरांनी धर्तीवर खुप अराजकता पसरवली होती . हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो . महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बाहेर इतर राज्यात हा दिवस महादेवांचा मणी मल्ला असूरांवर विजय म्हणूनच ओळखला आणि साजरा केला जातो . हा दिवस भगवान खंडोबा ह्यांचा मणी मल्ला असुरांवर विजय म्हणून ओळखला जातो.
(BOTH IMAGE CREDITS GOES TO IT'S REAL OWNER )
(वरील छायाचित्रांचे पूर्ण हक्क त्याच्या मुळ मालकाकडे सुरक्षित आहेत आणि त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाते .)
विशेषतः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात , तालुका पुरंदर येथे जेजुरी गावात भगवान खंडोबाचे पुरातन मंदिर आहे . ते एक जागरूक देवस्थान आहे .
२) पूजेचे महत्व काय आहे ?
चंपा षष्ठी च्या सहा दिवसात खंडोबांचे उपासक किंवा भक्त पहाटे लवकर उठून चालत मंदिरात येतात आणि खंडेरायांचे दर्शन घेतात .ह्या पूजे चे महत्व असे आहे की सहाही दिवस खंडोबांच्या मूर्तीसमोर तेलाचे दिवे आणि नंददीप लावतात .
३) विधी काय आहे ?
भगवान खंडोबा आणि मणी मल्ला ह्यांचे सहा दिवस युद्ध झाले होते म्हणून भक्तजन ते सहा दिवस मोठ्या श्रद्धा भावाने उपवास करतात . ह्या सहा दिवसात उपासक किंवा भक्तजन खंडेरायला नैवेद्य म्हणून फळे , भाज्या अर्पण करतात . सोबत हळद ही अर्पण करतात .
४) विधी चे महत्व काय आहे ?
चंपा षष्ठी च्या विधींचे पालन केल्याने , पालन करणाऱ्याला भगवान खंडोबा आशीर्वाद म्हणून सुख , समृद्धी आणि अनंदायी जीवन देतात .पालान करणाऱ्याच्या पूर्व जन्मातील सर्व पापे नष्ट होतात आणि वर्तमान जन्मात तो आनंदी जीवन जगतो .
५) चंपा षष्ठी ची पौराणिक कथा काय आहे ?
जेव्हा मणी आणि मल्ला ह्या दोन राक्षस भावांनी पृथ्वीवर अराजकता पसरवली होती . देव, साधू , ऋषी आणि पृथ्वीवरील सामान्य लोकांना विकोपाचा त्रास देत होते .
मनीचुर्न डोंगर जे सात्विक माणसांचे , ऋषी मुनींचे स्थान म्हणून ओळखले जात होते . जिथे होम हवन सारखे विधी होत होते तिथे मणी मल्ला असूरांनी येऊन अराजकता पसरवली होती. सर्व ऋषी मुनींनी महादेवांचा धावा केला . भक्तांची करूनापूर्ण हाक ऐकून महादेव देवी पार्वती सह तिथे प्रकट झाले . भक्तांनी त्याची व्यथा सांगितली . महादेवांनी क्रोधीष्ट होऊन त्यांच्या काही जटा तोडून जमिनीवर आपटल्या त्या काही जाटेतून काही भैरव प्रकट झाले आणि स्वतः महादेव आणि देवी पार्वती ह्यांनी दोन तेजस्वी अवतार घेतले. भगवान शिव ह्यांनी सहस्र सूर्याचे तेज असणारा रुद्र अवतार घेतला तो म्हणजे " खंडोबाचा अवतार " आणि देवी पार्वती ह्यांनी " देवी म्हाळसा चा" अवतार घेतला .
भगवान खंडोबा व देवी म्हाळसा आणि मणी मल्ला ह्यांचे युद्ध ज्या दिवशी सुरू झाले त्या दिवशी अमावस्या होती . भगवान खंडोबा व देवी म्हाळसा ह्यांचे मणी मल्ला सोबत भीषण युद्ध झाले . शेवटी मणी मल्ला ह्यांचा भगवान खंडोबा आणि देवी म्हाळसा च्या हातून वध झाला .
मणी मल्ला असुरांचा वध करण्यापूर्वी भगवान खंडोबा आणि देवी म्हाळसा ह्यांनी त्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारली होती. तेव्हा मणी मल्ला ह्यांनी त्यांची इच्छा सांगितली की त्या दोघांना कायमचे भगवान खंडोबा आणि देवी म्हाळसा सोबत स्थान पाहिजेत . भगवान खंडोबा आणि देवी म्हाळसा ह्यांनी त्या दोघांची इच्छा पूर्ण केली . म्हणून , प्रत्येक खंडोबा मंदिरात त्यांच्या सोबत मणी मल्ला असतात .
६) चंपा षष्ठी कशी साजरी करतात ?
मार्गशी्ष महिन्यात शुक्ल पक्षात प्रथम तिथीला अमावस्येला मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सारंभ सुरू होते . ह्या षडरात्रीचा शेवट त्याच्या साहव्य दिवशी चंपा षष्ठी ला होतो . षडरात्री च्या साहव्या दिवशी म्हणजे चंपा षष्ठीला खंडोबांचे ( महाराष्ट्र व कर्नाटक सोडून इतर राज्यात महादेवांचे भक्त व उपासक) उपासक व भक्त ब्रह्म मुहूर्तावर जागे होतात . त्यांची दैनंदिन विधी आटपून नंतर स्नान अर्पून घेतात . त्या नंतर ते महादेवांचे ध्यान करतात . मंदिरात जाऊन शिवलिंगावर साधे जल किंवा गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करतात . बेलपत्र अर्पण करतात . जे भक्त हे सहा दिवस मनापासून समर्पित होऊन साजरे करतात त्यांचे भगवान खंडोबा सर्व वाईट शक्तींपासून रक्षण करतात .
७) चंपा षष्ठी ला भगवान खंडोबा ह्यांना काय नैवेद्य दाखवतात ?
चंपा षष्ठी च्या दिवशी भगवान खंडोबा ह्यांना नैवेद्य म्हणून रोडगा (रोडगे हे दोन प्रकारचे असतात ज्वारी किंवा बाजरीचे जसे भाकरी असते . भाकरीच्या तुलनेत रोडगे पुरीच्या अकारासारखे लहान आणि जाड असतात ) , कांदा , लसूण आणि वांग्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थ .
८) चंपा षष्ठीला स्कंद षष्ठी का म्हटले जाते ?
इतिहासात तारकासुर नावाचा एक राक्षस होता . त्याने तिन्ही लोकात अराजकता पसरवली होती. देवलोकातील देवांचे , विशेषतः इंद्र देवाचे अधिपत्य तारकासुरामुळे संकटात आले होते . तारकासुर ला ब्रह्म देवांकडून वरदान होते की त्याचा वध फक्त शिवपुत्र करू शकतो आणि ते त्यावेळेला असंभव होते . कारण महादेव हे एका गुहेत घोर तपस्याला बसले होते . इकडे देवी पार्वती ला सुद्धा महादेवांशी लग्न करायचे होते . म्हणून , त्या खुप प्रयत्न करत होते महादेवांना त्यांच्या तपस्यमधून बाहेर काढण्याचा . इंद्र देवाने देवी पार्वती ह्यांच्या साक्षीने कामदेव आणि रती ची मदत घेऊन महादेवांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला . पण महादेवांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून महादेवांनी कामदेवाला स्वतःच्या क्रोधाग्निने भस्म करून टाकले . सौंदर्य मार्गाने महादेवांना प्राप्त करण्याचा मार्ग निष्फळ झाल्यामुळे देवी पार्वती ह्यांनी त्यांची तपस्या सुरू केली . खुप घनघोर तपस्या नंतर महादेव देवी पार्वतीवर प्रसन्न झाले आणि देवी पार्वती ह्यांनी त्यांच्या समोर विवाह ची मागणी केली . महादेव आणि देवी पार्वती ह्यांचा विवाह झाला . खुप काळ उलटून गेल्या नंतर भगवान कार्तिकेय ह्यांचा जन्म झाला . महादेवांनी स्वतः भगवान कार्तिकेय ह्यांना युद्ध कलेचे प्रशिक्षण दिले . काही प्रसंगानंतर भगवान कार्तिकेय ह्यांनी तारकासुराचा वध केला . तेव्हा पासून त्या दिवसाला स्कंद षष्ठी बोलतात कारण भगवान कार्तिकेय ह्यांचे एक नाव स्कंद सुद्धा आहे .
९) स्कंद षष्ठी चे महत्व .
भगवान शिव आणि भगवान कार्तिकेय ह्यांची एकत्र पूजा करण्याचा दिवस म्हणजे स्कंद षष्ठी ( चंपा षष्ठी ) . ह्या दिवशी जो भक्त भगवान शिव आणि भगवान कार्तिकेय ची पूजा करेल त्याची सर्व पाप नष्ट होऊन जातील आणि त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन जातील . तो त्याच्या जीवनात आनंद अनुभवतो . स्कंद षष्ठी ला उपवास केल्याने मागील जन्मातील सर्व पाप नष्ट होतात . भक्ताच्या पत्रिकेतील त्याच्या राशीतील मंगळाची शक्ती वाढवायची असेल तर भगवान कार्तिकेय ची उपासना करणे गरजेचे आहे . कारण भगवान कार्तिकेय हे मंगळाचे स्वामी आहेत .
HOME
[ Home ]
Comments
Post a Comment