Posts

Showing posts from December, 2023

श्री दत्त गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे आठ पौराणिक शिष्य .

Image
                               🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻            🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻 १) श्री दत्त अवताराचे स्वरूप . त्रिमूर्तींचे एक स्वरूप म्हणजे दत्त अवतार . दत्तात्रेयांचा अवतार हा चिरंजीवी आहे  . ते कलियुगाच्या शेवटापर्यंत राहणार आहेत .  दत्तात्रेय हे इसवीसनाच्या पाचव्या शतकपासून पुराणात प्रसिद्ध आहेत . दत्तात्रेये दैवत हे तीन शिरे आणि सहा हात असे दिसायला आहे . दत्तात्रेयांच्या खालच्या दोन हातात माळ आणि कमंडलू आहे . तर मधल्या दोन हातात त्रिशूल व डमरू आणि वरच्या दोन हातात सुदर्शन चक्र आणि शंख .  त्यांचे तीन शिर आणि सहा हातातल्या प्रत्येक वेगवेगळी गोष्ट हे त्रिमूर्तींना दर्शवितात . त्यांच्या सोबत एक गाय जी माता देवी पृथ्वी ला आणि चार कुत्रे जे चार वेद व महादेवाचे चार भैरव दर्शवितात . दत्तात्रेय जेव्हा सगुण अवतारात ( म्हणजे देह रुपात ) पृथ्वी वर होते तेव्हा त्या कालावधी मध्ये दत्त संप्रदाय मध्ये काही उप - दत्त संप्रदाय निर्माण झाले . ह्या सर्व संप्रदायंचे मुख्य देवता हे " श्री गुरु दत्तात्रेय " आहेत . दत्तात्रेय हे संपूर्ण

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.

Image
            🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻    🙏🏻🏵️🙏🏻यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏻🏵️🙏🏻 1) चंपा षष्ठी म्हणजे काय ?  चंपा षष्ठी हा भगवान शंकरांच्या अवताराला खंडोबाला समर्पित आहे . चंपा षष्ठी च्या ह्या दिवशी भगवान खंडोबा ह्यांनी मणी मल्ला असुर ह्यांचा वध केला . त्या असुरांनी धर्तीवर खुप अराजकता पसरवली होती . हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो . महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बाहेर इतर राज्यात हा दिवस महादेवांचा मणी मल्ला असूरांवर विजय म्हणूनच ओळखला आणि साजरा केला जातो . हा दिवस भगवान खंडोबा ह्यांचा मणी मल्ला असुरांवर विजय म्हणून ओळखला जातो. (BOTH IMAGE CREDITS GOES TO IT'S REAL OWNER ) (वरील छायाचित्रांचे पूर्ण हक्क त्याच्या मुळ मालकाकडे सुरक्षित आहेत आणि त्याचे सर्व श्रेय त्यालाच जाते .) विशेषतः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात , तालुका पुरंदर येथे जेजुरी गावात भगवान खंडोबाचे पुरातन मंदिर आहे . ते एक जागरूक देवस्थान आहे .  २) पूजेचे महत्व काय आहे ?        (image credit goes to it's real owner) चंपा षष्ठी च्या सहा दिवसात