Krupa asavi ya dasavar

कृपा असुदे या दासावर .

      🙏🏻🏵️🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

        🙏🏻🏵️🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻

कृपा असू दे या दसावर


सदगुरुचरणी अत्यंत करुण हृदयाने प्रार्थना

कृपा असू दे या दासावर | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||धृ||
तव नामाच्या जय घोषाने | लाभे आत्मानंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

धन्य झाले श्री टेंबेकुल | माणगांव हे अति पुण्यस्थळ ||
तिथे जन्मुनी पसरविलास तू | आपुला किर्ती सुगंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

मानवदेही जणु परमेश्वर | अवतरलासी या भूमीवर ||
भक्तांच्या हृदयात रुजविला | आत्मोन्नतीचा कंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

तुझे आचरण दिव्य तपोबल | त्यागी जीवन चरित्र उज्वल ||
स्मरणी पडता जग मायेचे | तुटोनी जाती बंध | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

साहित्याची करुनी सेवा | उद्धरण्यास तव मानवजीवा ||
प्रदान केला नीज ग्रंथातुनी | आध्यात्मिक मकरंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

सुबोध त्यातील अमृतवचने | जागृत करीती अत्मलोचने ||
पदता पदता ज्ञानी बनले | कितीक तरी मतीमंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

गरुडेश्वरी अगाध महिमा | मांगल्याची जिथे पौर्णिमा ||
तुझ्या दर्शने पावन होत | भाविक भक्तजनवृंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

नामस्मरणी चित जडावे | जीवाशीवाचे ऐक्य घडावे ||
सहज सुटावा संसारातील | आसक्तीचा छंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय ||

मी अज्ञानी अनाथ म्हणून | हीच प्रार्थना करितो चरणी ||
कृपा ओघ तव माझ्यावरचा | कधी न व्हावा बंद | सदगुरू वासुदेवानं-दत्तात्रेय || 

Please do copy paste !!!

प्लिज कॉपी पेस्ट करून घ्या  !!! . 

कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला कलर नोट म्हणून ॲप सुचवतो त्याची लिंक मी खाली दिली आहे . तो ॲप तुम्ही प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करू शकता. 👇🏻👇🏻👇🏻



Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक  छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 


Home 👇🏻👇🏻👇🏻


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.