Tulsi Vivah mahiti
🙏🏻🏵️🙏🏻ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻🏵️🙏🏻
तुळशीच्या लग्नाबद्दल माहिती :-
आपल्या घरातील कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची – तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते, त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला सर्व सौभाग्य व अलंकारांनी जसे की, गजरा, मंगळसूत्र, हिरवा चूडा, जोडवी यांनी सजवितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ त्यात ठेवतात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात.पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. घरातील सवाष्णी खण नारळ, सूपारीने तुळशीची ओटी भरतात. या दिवशी प्रसादाला दहीपोहे, हरभरा डाळीची उसळ. अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णाच्या आवडीचा बेत असतो. लहान मुले फुलबाज्या, अनार व फटाके उडवून आनंद साजरा करतात.
Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻
तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?
हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते .
तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . खालील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही माझ्या ब्लॉग वरील अजून काही साहित्य बघू शकता आणि मला फॉलो पण करू शकता .
Home 👇🏻👇🏻👇🏻
----------------x---------------x---------------x---------------
Comments
Post a Comment