Sadguru yave mam bhajni sadar vhave
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे.
सदगुरु यावे | मम भजनी सादर व्हावे||धृ||
तव आगमने विघ्ने पळती | कामादिक रिपु नष्टचि होती |
आशा तृष्णा मनिं बहुत झुरती | कोठे जावे ||१||
भवविपिनीचा मार्ग भयंकर | क्षीरधारेपरि म्हणती कविवर |
सदगुरु येउनि धरितिल जरि कर | अमरचि व्हावे ||२||
किती रे माझा अंत पाहसी | मज दिनासी काय मागसी |
विश्वाचा तू पालक अससी | मनि समजावे||३||
माझा धावा हा परिसोनी | दंडकमंडलु करि घेवोनि |
देशिक आले हो धावोनी | आसन द्यावे ||४||
हृत्पीठावरि गुरु हे बसले | भजनी प्रेमाचे पुर आले |
सीतारामी चित्त रंगले | सात्त्विक भावे ||५||
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
|| श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी की जय ||
Please do copy paste !!!
कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.
कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला कलर नोट म्हणून ॲप सुचवतो त्याची लिंक मी खाली दिली आहे . तो ॲप तुम्ही प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करू शकता. 👇🏻👇🏻👇🏻
Color note
Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻
तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?
हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते .
तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे .
Home 👇🏻👇🏻👇🏻
Comments
Post a Comment