Shri Gurustotrapanchak
श्री गुरुस्तोत्रपंचक .
🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻
🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻
भावे नमू श्री गुरूच्या पदासी |
जो आपदांसी हरी दे पदांसी ||
दासी परी श्री नमी ज्या पदांसी |
यासी भजे तो नमितो पदासी ||१||
.
सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य |
सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य |
समद विमद होती यत्प्रसादे न होती |
कुगती सुगती देती त्या पदा हे विनंती ||२||
.
गुरुपदा विपदापहरा सदा ।
अभयदा भयदामयदारदा |
हृतवदान्यमदा तव दास्य दे |
अमददा गदहा न कुदास्य दे ||३||
.
नमस्ते भवारे नमस्ते शतारे |
नमस्ते घवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे |
नमस्ते खालारे विहस्तेष्टदात्रे |
नमस्ते रिवैरे समस्तेष्टसत्रे ||४||
.
गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी |
गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी |
सतत विनत होतां वारी जें आपदांसी |
सतत विनत होऊं आम्ही ही त्या पदांसी ||५||
.
भावे पठति जें लोक हे गुरुस्तोत्रपंचक |
तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ||
.
|| इति श्रीमत परमहंस परिव्राजाकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं गुरुस्तोत्रपंचकं संपूर्णम ||
Please do copy paste !!!
कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.
कॉपी पेस्ट करण्यासाठी किंवा ह्या ब्लॉग वरील स्तोत्र , मंत्र आणि इत्तर माहिती साहित्य सेव्ह करून ठेवण्यासाठी मी तुम्हाला कलर नोट म्हणून ॲप सुचवतो त्याची लिंक मी खाली दिली आहे . तो ॲप तुम्ही प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करू शकता. 👇🏻👇🏻👇🏻
Color note
Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻
🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻
तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ?
हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते .
तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे .
Home 👇🏻👇🏻👇🏻
Comments
Post a Comment