Datta majla prasann hoshi .

🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी ।

तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।धृ।। 

स्मरण तुझें मज नित्य असावे तव गुण भावे गावे।

अनासक्तिने मी वागावे ऐसे मन वळवावे ।।१।। 

सर्व इंद्रिये आणि मन हें तुझे हाती आहे । 

यास्तव आतां तू लवलाहें स्वपदी मन रमवावे ।।२।। 

विवेक आणि सत्संगति हे नेत्रद्वय आहे । 

वासुदेव निर्मल देहें जेणें त्वत्पदीं राहे ।।३।। 

दत्ता मजला प्रसन्न होसी जरि तूं वर देसी।

तरि मी आनन मागें तुजसी निर्धारुनी मानसी ।।


Please do copy paste !!! 

कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!.


Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक  छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 

Home 👇🏻👇🏻👇🏻



Comments

Popular posts from this blog

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

Shri Dattabavani . pdf