Taptrayane mam deh tapla :- Shri Datta Prarthana .

🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

         🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻


|| श्री दत्तात्रेयांची प्रार्थना  ||

तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला
विश्रांती कोणी नच देतसे मला ||
दैवे तुझे हे पद लाभलें मला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||१||

कामादि षड्वैरी सदैव पिडिती |
दुर्वासना अंग सदैव ताडिती ||
त्राता दुजा कोण न भेटला मला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||२||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

देही अहंता जडली न मोडवे |
गृहात्मज स्त्रीममता न सोडवे ||
त्रितापदावानल पोळितो मला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||३||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

अंगी उठे हा अविचार दुर्धर |
तो आमुचें हें बुडवितसे घर ||
पापें करूनी जळतो त्वरे मला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||४||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

तूंची कृपासागर मायबाप तूं |
तूं विश्वहेतू हरि पाप ताप तूं ||
न तूजवाचूनि दयाळू पाहिला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला||५||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

दारिद्र्यदावे द्विज पोळतां तया |
श्री द्यावया तोडिसी वेल चिन्मया ||
तयापरी पाही दयार्द्र तूं मला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||६||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

प्रेतासि तूं वांचविसी दयाघना |
काष्ठासि तूं पल्लव आणिसी मना ||
हें आठवी मी तरी जीव कोमला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||७||
तापत्रयानें मम देह तापला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

ह्या अष्टके जे स्तविती तयांवरी |
कृपा करी हात धरी तया शिरी ||
साष्टांग घालू प्रणिपात बा तुला |
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला ||८||
तापत्रयानें मम देह तापला |

दत्ता कृपासाऊली दे नमू तुला
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला
दत्ता कृपासाऊली दे नमू तुला

|| श्री गुरूदेव दत्त ||

Please do copy paste !!! 

कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. 

Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 


Home 👇🏻👇🏻👇🏻


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.