SHRI GURUCHARITRA PARAYAN :- नियमावली व पद्धती .

          🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

         🙏🏻🏵️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🏵️🙏🏻


श्री दत्तात्रेय महप्रभुंनी नामधरकांस अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे . श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो . श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे . श्री गुरुचरित्र पारायण हे अंत: करण शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत . 

१) श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शकत्यो शनिवारी व सांगता शक्योतो शुक्रवारी करावी ; कारण शुक्रवार हा श्री नृसिंहसरस्वती महाराजांचा निजनंदाचा दिवस आहे . 

२) श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा . 

३) श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे . वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या प्रतिमेची ( फोटोची ) व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोठी वाचण्यास सुरुवात करावी . 


४) श्री गुरुचरित्र वाचन पहाटे ३.०० ते सायंकाळ ४.०० या दरम्यान करावे . दुपारी १२.०० ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे .


५) श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये , आपली आई , पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही . उपवास करू नये . दोन्ही वेळेस ( सकाळ - संध्याकाळ ) एक धान्य फराळ करावा . काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही . 


६) श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये , स्वतःच्या हाताने दाढी करावी . तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे . श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे .


७) श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये . स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जननशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडु नये . श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच सांभाळावे . वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे .


८) सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी . रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनामस्तोत्रम् वाचावे . 


९) श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत : 

पहिला दिवस :  अध्याय १ ते ९ 

दुसरा दिवस :   अध्याय १० ते २१ 

तिसरा दिवस :  अध्याय २२ ते २९

चौथा दिवस  :  अध्याय ३० ते ३५ 

पाचवा दिवस :  अध्याय ३६ ते ३८ 

साहवा दिवस : अध्याय ३९ ते ४३ 

सातवा दिवस  :  अध्याय ४४ ते ५३ 


१०) श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु २१ दिवसांत ३ पारायण , ४९ दिवसांत ७ पारायण करावयाच्यादेखीलपद्धती आहेत . सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी . सांगतेच्या दिवशी सकाळी १०:३० वा . श्री दत्त महाराज  , श्री स्वामी समर्थ महाराज , श्री कुलदेवता व एक श्री गुरूचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा . ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे . 


११) श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये . 

* श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये , एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी  करावे . वयक्तिक पारायण सात दिवसांचे असावे . * 


श्री गुरुचरित्रच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे . दुखितांना , वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना , असाध्य आजार झालेल्यांना , जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना , पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे . श्री गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते . त्यासाठी घरा मध्ये तात्पुरते विटांचे कुंड बनवून त्यात गहू , तांदूळ , साखर , तीळ व तूप असे एकत्र करून हविर्द्रव्याने प्रत्येक ओविस स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा . अति आजारासाठी नाडीवर्देखील श्री गुरुचरित्र वाचता येते .  

    🙏🏻🏵️🙏🏻  श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻

नियमांची नोंद करण्यासाठी . मी तुम्हाला हा ॲप सूचित करतो 👉🏻 Color note

Please do copy paste !!! 

कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. 

Shri Gurucharitramrut .pdf link !!! 👇🏻👇🏻👇🏻
श्री गुरुचरित्रामृत . पीडीएफ लिंक !!! 👇🏻👇🏻👇🏻


Home 👇🏻 👇🏻👇🏻 


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.