Jagatvandya avdhut digambara

🙏🏻🏵️🙏🏻 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🏵️🙏🏻 

      🙏🏻🏵️🙏🏻 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🏵️🙏🏻

जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना

जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना
बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१।

स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना
करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२।

चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना
कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना
वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३।

वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना
ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना
वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४

अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना
रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना
सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना
चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना
साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५।

कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना
माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।। 

Please do copy paste !!! 

कृपया कॉपी पेस्ट करून घ्या !!!. 

Notice * * नोटीस * 👇🏻👇🏻👇🏻


🙏🏻 नमस्कार स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींनो 🙏🏻🙏🏻 

तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला स्वामी बंधू किंवा स्वामी भगिनी का बोललो ? 

हे बघा आपण सगळेच दत्त गुरूंचे सेवक आहोत . ह्या ब्लॉग वर येणारे सर्व लोक हे दत्त उपासक आहेत . माझे सर्व कुटुंब स्वामी समर्थांचे उपासक आहे आणि श्री स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार . हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे . जिथे दत्त गुरू आणि स्वामींमध्ये काही अंतर नाही तिथे दत्त उपासक हेच स्वामींचे सेवक हे सिद्ध होते . 


तर माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या सगळ्यांना . माझ्या ब्लॉग वरील सर्व पोस्ट तुम्ही तुम्हाला जमेल तसे तुमच्या ओळखीतील सर्व स्वामी बंधू आणि स्वामी भगिनींना पाठवा . ज्यांच्या कडे ह्यातील कुठलेच ग्रंथ नाही आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याची एक छोटीशी स्वामी सेवा स्वामी माझ्या कडून करून घेत आहेत . तर त्या स्वामी सेवेत तुम्ही पण शमील वाहा आणि गरजवंत कडे ह्या माझ्या ब्लॉग वरील पोस्ट पोहचुदे . 

Home 👇🏻👇🏻👇🏻


Comments

Popular posts from this blog

SHRI SHANKAR MAHARAJ GEETA - श्री शंकर गीता. pdf .

KALAVATI AAI BALOPASANA PDF - कलावती आई बालोपासणा मराठी पीडीएफ .

खंडोबा दैवत आणि चंपा षष्ठी.